Bharat Ganeshpure Shared Mhada New Home Instagram
मनोरंजन बातम्या

Bharat Ganeshpure New Home: हटक्या स्टाईलची नेमप्लेट अन् जबरदस्त इंटिरियर, भारत गणेशपुरेंच्या घराची झलक पाहिलीत का?, Video व्हायरल

Bharat Ganeshpure News: ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरेने सोशल मीडियावर त्याच्या नव्या घराची झलक शेअर केली आहे.

Chetan Bodke

Bharat Ganeshpure Shared Mhada New Home

‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून भारत गणेशपुरेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. आपल्या दमदार विनोदीशैलीमुळे त्याने मोठ्या प्रमाणावर स्वतःची ओळख निर्माण केली. भारतच्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज व्हायरल होत असतात. नुकतंच त्याने त्याच्या नव्या घराबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्याला म्हाडामध्ये घराची लॉटरी लागली आहे. त्याच नव्या घराबद्दल पोस्ट अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

भारत गणेशपुरेने आतापर्यंत चित्रपटातून, कॉमेडी शो आणि नाटकातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा भारत गणेशपुरे सध्या त्याच्या नव्या घरामुळे चर्चेत आला आहे. भारतने नुकतंच नव्या घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. भारतच्या घरातील इंटिरियर, घराची सजावट, प्रशस्त वॉडरॉबने आणि त्याच्या खास वऱ्हाडी स्टाईलच्या नेमप्लेटने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

भारत गणेशपुरेचं नवं कोरं घर पत्नी अर्चना, मुलगा विपुल आणि मुलगी अर्चनाने एकत्र मिळून घराची सजावट केली आहे. मुलगा विपुलच्या रुममधील आकर्षक फर्निचर, शोच्या वस्तू, इंटिरियर, प्रशस्त वॉडरॉबने सर्वांचेच लक्ष वेधले. मुलगा विपुलला कारची प्रचंड आवड आहे. त्याने कारच्याच आधारे आपल्या रुमची डिझाईन केली आहे. भारतच्या घरात भिंतींना असलेल्या रंगसंगती आणि फर्निचर डिझाईन सर्वाधिक लक्ष वेधत आहे.

घरामध्ये असलेल्या स्पेशल कॉरिडोअरमध्ये भारतला चाहत्यांनी दिलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच मिळालेले ॲवॉर्ड सुद्धा कॉरिडोअरमध्ये दिसत आहे. भारत यांचं हे नवं घर चाहत्यांना फारच आवडले आहे. अनेकांनी भारतचं हे नवं घर फार आवडलंय, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

SCROLL FOR NEXT