Abhishek Malik And Friend Three Men Assault Instagram
मनोरंजन बातम्या

Abhishek Malik And Friend Three men Assault: प्रसिद्ध अभिनेत्यासह मैत्रिणीवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला, अभिनेता जखमी

Abhishek Malik News: टेलिव्हिजन अभिनेता अभिषेक मलिक आणि मैत्रिण शुक्रवारी मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये तीन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Abhishek Malik And Friend Three Men Assault: टेलिव्हिजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. टेलिव्हिजन अभिनेता अभिषेक मलिक आणि मैत्रिण शुक्रवारी मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये तीन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला आहे.

शुक्रवारी (११ ऑगस्ट) रोजी दुपारच्या सुमारास अभिनेता आणि त्याची मैत्रिण मुंबई विमानतळावरून घरी जात असताना, त्या दोघांवर एका अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास अभिषेक मलिक आणि त्याची मैत्रिण जोगेश्वरीतील शंकरवाडी बस स्टॉपवर पोहोचले, त्यावेळी अभिषेक आणि मैत्रिण कारमध्ये असताना, एक व्यक्ती त्यांच्या गाडीच्या समोर आली. त्यावेळी तो त्यांच्याकडे बघत हातवारे करत असल्याचे अभिनेत्याला दिसले.

त्या माणसाला काय म्हणायचे आहे, हे विचारण्यासाठी मी माझ्या कारची काच खाली केली. मी काही बोलायच्या आधीच त्या अज्ञात व्यक्तीने माझ्या गाडीवर काही कारण नसताना मारायला सुरूवात केली. जेव्हा मी त्याच्यासोबत दोन हात करण्यासाठी गाडीतून बाहेर पडलो, त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या तीन व्यक्तींनी अज्ञात व्यक्तींनी माझ्यावर हल्ला केला. सोबतच त्या हल्लेखोरांकडे काही धारदार शस्त्र देखील असल्याची माहिती अभिनेत्यांना पोलिसांना दिली.

“जेव्हा मलिकची मैत्रिण त्याला मदत करण्यासाठी कारमधून खाली उतरली, त्यावेळी त्या तीन अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर हल्ला केला. तिथून जात असलेल्या काही लोकांनी जेव्हा तिची मदत केली, तेव्हा ते पळून गेले.” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्राणघातक हल्ल्यात अभिनेत्याच्या चेहऱ्याला, डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

मलिकवर आणि त्याच्या मैत्रिणीवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याने लगेचच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “झालेल्या प्रकारानंतर मी लगेचच आंबोली पोलीस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आम्हाला लगेचच रुग्णालयात दाखल केले.” असं अभिनेत्याने पोलिसांना स्टेटमेंटमध्ये सांगितले.

हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर भादवि कलम ३२३, ३२४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस हल्लेखोरांचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तुरुंगवास

बकरी ईदनिमित्त दुर्गाडीवर तणाव; नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स तोडले| Video

Heatwave In Nagpur: नवतपात सूर्याचा कहर, नागपुरात २४ तासांत १० जणांचा मृत्यू

सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पाणी; महिनाभरात चरबी वितळेल, दिसाल एकदम बारीक!

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

SCROLL FOR NEXT