Tejaswi Prakash and Karan Kundras upcoming music video Barish Aayi Hai teaser has been released Saam Tv
मनोरंजन बातम्या

VIDEO : करण कुंद्रा-तेजस्वीच्या केमिस्ट्रीनं पुन्हा जिंकली चाहत्यांची मने

बिग बॉस फेम करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात प्रिय कपलपैकी एक आहेत. करण आणि तेजस्वीचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बिग बॉस फेम करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात प्रिय कपलपैकी एक आहेत. करण आणि तेजस्वीचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्यांना पडद्यावर एकत्र पाहायला चाहत्यांना खूप आवडते. या कपलचा बिग बॉसनंतरचा पहिला म्युझिक व्हिडिओ 'रुला देती है' चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरला होता. आता तेजस्वी-करण त्यांच्या चाहत्यांसाठी आणखी एक रोमँटिक गाणे "बारिश आयी है" घेऊन आले आहेत.

अलीकडेच, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा आगामी म्युझिक व्हिडिओ 'बारिश आई है' चा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. करणने त्याच्या सोशल मीडिया हॅंडलवर व्हिडिओ शेअर करत 'आता बरसेल खरा पाऊस. १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पाहा.' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. टीझर पाहून तेजस्वी आणि करणचे चाहते त्यांच्या आगामी म्युझिक व्हिडिओ पाहण्यासाठी उत्साही आहेत.

करण आणि तेजस्वीने त्यांच्या नवीन म्युझिक व्हिडिओचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. रोमँटिक टीझरमध्ये, तेजस्वी आणि करण एकमेकांकडे धावताना दिसत आहेत. दोघे एका पुलावर भेटतात आणि एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. टीझरमध्ये, हे कपल पावसाचा आनंद घेताना दिसत आहे. परंतु गाण्याच्या शेवटी ते वेगळे होतात. स्टेबिन बेन आणि श्रेया घोषालने हे गाणं स्वरबद्ध केलं आहे.

सोशल मीडियावर टीझर पोस्ट केल्यानंतर लगेचच, या दोघांच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी मित्रांनी कमेंट करून या नवीन व्हिडीओसाठी शुभेच्या दिल्या आहेत. या दोघांनी त्यांच्या प्रेमाने भरलेल्या व्हिडिओद्वारे चाहत्यांना खूश करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हे कपल अनेकदा त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या चाहत्यांची मने जिंकत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

SCROLL FOR NEXT