Big Boss 15 finale Instagram
मनोरंजन बातम्या

Big Boss 15: तेजस्वी प्रकाश ठरली ‘बिग बॉस 15’ची विजेती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - तेजस्वी प्रकाशने प्रसिद्ध शो बिग बॉस 15 ची (Big Boss) ट्रॉफी जिंकली आहे. 4 महिने चाललेल्या या शोमध्ये तेजस्वी प्रकाशने (Tejasswi Prakash) लोकांचे भरपूर मनोरंजन केले. सुरुवातीपासूनच तेजस्वीने जनतेला गुंतवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या संपूर्ण प्रवासात तेजस्वीकडून अनेकदा चुका झाल्या पण तिने प्रत्येक गोष्टीत आपल्या गोंडस शैलीने लोकांची मने जिंकली. बिग बॉस 15 च्या फिनालेमध्ये तेजस्वी प्रकाशने प्रतीक सहजपालचा पराभव केला. बिग बॉस 15 च्या ट्रॉफीसह, तेजस्वी प्रकाशला निर्मात्यांकडून एकूण 40 लाख रुपये बक्षीस रक्कम देखील मिळाली आहे. (Big Boss 15 Winner)

तेजस्वी प्रकाश हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. तेजस्वी प्रकाशने अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. बिग बॉसच्या घरातील तेजस्वीचा प्रवास एकदम धमाकेदार आणि तितकाच मजेदार ठरला. करण कुंद्रासोबतची तिची रोमॅन्टिक केमिस्ट्री चांगलीच गाजली. ‘बिग बॉस 15’च्या घरात तेजस्वी व करण कुंद्रा या दोघांची लव्ह केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती.

आत्तापर्यंत तेजस्वी प्रकाशने अनेक सुपरहिट टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 'स्वरागिनी'पासून 'पहरेदार पिया की' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों का 2' पर्यंत अनेक शोमध्ये तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तेजस्वी प्रकाशचे प्रत्येक शोमधील काम प्रेक्षकांनाही आवडले आहे. बिग बॉस 15 च्या आधीही तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 10’मध्येही तेजस्वीचा जलवा पाहायला मिळाला होता. या शोमधील होस्ट रोहित शेट्टीसोबतची तिची बॉन्डिंग देखील लोकांना आवडली होती.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या मागणीने अजितदादांचं घड्याळ जाणार ?

Maharashtra Politics : वरळीत रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना? आदित्य यांच्या विरोधात काका राज ठाकरे कोणती खेळी खेळणार? पाहा व्हिडिओ

Wai:वाई मार्गे सातारा जाणं ठरेल भारी; घडेल दक्षिण काशीचं दर्शन

Amir Khan : आमिर खान घेणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पुढाकार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात साधला संवाद

Pimpri News : पिंपरीत भाजपचा राष्ट्रवादीला उघड विरोध

SCROLL FOR NEXT