Premachi Gosht Tejashri Pra Saam TV
मनोरंजन बातम्या

Tejashri Pradhan New Serial : तेजश्री प्रधान सांगणार 'प्रेमाची गोष्ट'; कधी, केव्हा आणि कुठे पाहता येणार नवी मालिका

Premachi Gosht Promo : तेजश्री प्रधानाची नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर टेलिकास्ट होणार आहे.

Pooja Dange

Tejashri Pradhan New Serial Premachi Gosht : 'होणार सून मी या घराची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जान्हवी म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्रीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अगंबाई सासूबाई या मालिकेतून तेजश्री प्रधान पुन्हा एका एकदा सुनेच्या भूमिकेत दिसली. तिच्या या व्यक्तिरेखेवर देखील प्रेक्षकांनी खूप प्रेम केले.

'अगंबाई सासूबाई'नंतर तेजश्री कोणत्याही मालिकेत दिसली नाही. आता काही वर्षांच्या गॅपनंतर तेजश्री पून्हा एकदा टीव्ही मालिकांकडे वळली आहे. नुकतीच तिच्या नव्या मालिकेची घोषणा झाली आहे.

तेजश्री प्रधानने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या पोस्टच्या माध्यमातून तिने नव्या मालिकेसह ती आपल्या भेटीला येत असल्याचे सांगितले होते. आता या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

तेजश्री प्रधानची नवी मालिका

तेजश्री प्रधानाची नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर टेलिकास्ट होणार आहे. ४ सप्टेंबरपासून ही मालिका रात्री ८ वक्ता आपल्या भेटीला येणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' असे या मालिकेचे नाव आहे.

'प्रेमाची गोष्ट'चा प्रोमो

या मालिकेच्या प्रोमोमध्ये तेजश्री प्रधानची म्हणजेच शुभांगी गोखले तिच्या लागणीसाठी स्थळ शोधात असते. परंतु तेजश्री आई होऊ शकत नसल्याने ती लग्नाला करण्यास नकार देते. तर तिच्या समोरच्या घरात राहत असणारा राज हंचनलेची आई देखील त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधात असते. परतुं त्याच्या लहान मुलीला कोणतीच मुलगी सांभाळू शकणार नाही म्हणून तो लग्नाला नकार देतो. (Latest Entertainment News)

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेचा प्रोमो फार रंजक आहे. तसेच मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकनाच्या पसंतीचे आहेत. स्टार प्रवाहवरील ही मालिका प्रेक्षांची मन नक्की जिंकेल. तसेच मालिकेच्या टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाहच्या आणखी एका मालिकेची भर पडेल.

स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकरी कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. तेजश्री प्रधान म्हणजे मालिका हिट होणार असे म्हणत आहेत. तसेच ही मालिका स्टार प्लसवरील हिंदी मालिका 'ये हैं मोहब्बते'ची कॉपी असल्याने ट्रोल देखील करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs UAE : भारत दुबईत यूएईला भिडणार, हवामान अन् खेळपट्टीचा फायदा कोणाला होणार? वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT