Tanmay Bhat’s YouTube Channel Hacked Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tanmay Bhat’s YouTube Channel Hacked: कॉमेडियन तन्मय भटचं यूट्यूब चॅनल हॅक! नाव बदललं, सर्व व्हिडिओ केले डिलीट

Tanmay Bhat YouTube Videos Deleted: प्रसिद्ध युट्युबर तन्मय भटचे नुकतंच सायबर ॲटेकमध्ये युट्युब अकाऊंट हॅक झाले आहे.

Chetan Bodke

Tanmay Bhat YouTube Channel Name Rename: प्रसिद्ध युट्युबर तन्मय भटचे नुकतंच सायबर ॲटेकमध्ये युट्युब अकाऊंट हॅक झाले आहे. ४४ लाखांहून अधिक सब्स्क्राईबर असलेल्या या अकाऊंटचे नाव आता “टेस्ला कॉर्प” असे झाले आहे. सोबत हॅकर्सने त्या अकाऊंटवरील अनेक व्हिडीओ देखील डिलीट केले आहे.

तन्मय भटने ट्विटरच्या माध्यमातून YouTube आणि G-Mail चे अकाऊंट हॅक झाले असल्याची माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी २ स्टेप व्हेरिफिकेशन देखील पूर्ण हॅकर्सनी ब्रेक केले असल्याचे सांगितले आहे. Google आणि YouTube कडे मदत मागत तन्मयने ट्वीट केले की, “हाय मित्रांनो - माझे YouTube/Gmail खाते हॅक झाले आहे. 2FA बायपास झाले आहे. मला तातडीने मदत हवी आहे.”

अधिक तपशील शेअर करत, तन्मय भटने YouTube ला त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, हॅकर्सनी त्यांच्या YouTube चॅनेलवर लाईव्ह व्हिडीओ देखील सुरू केला आहे, ते लाईव्ह व्हिडीओ त्यांनी प्रायव्हेट व्हिडीओ मध्ये सुरू केली.

तन्मयने ट्विट केले की, “@TeamYouTube, माझे चॅनल हॅक झाले असून हॅकर्सने लाईव्ह व्हिडीओ सुरू केला आहे." भट यांनी सांगितले की, हॅकर्सने केवळ त्याचे अकाऊंटच हॅक केले नाही तर, सोबतच त्यांनी २ स्टेप व्हेरिफिकेशन देखील पूर्णपणे ब्रेक केले आहे. (Entertainment News)

मिळालेल्या माहितीनुसार,  स्टँड-अप कॉमेडियन ऐश्वर्या मोहनराज आणि YouTuber अब्दू रोजिक यांच्यासह इतर अनेक प्रमुख YouTubers देखील अशाच हॅकिंगच्या घटनांना बळी पडले आहेत. 

हॅकर्सने या सर्व YouTubersच्या अकाऊंटचे नाव बदलले असून त्यातील व्हिडीओ देखील डिलीट केल्याची माहिती मिळाली आहे. सोबत कव्हर फोटो देखील हॅकर्सने बदलला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

On This Day: रोहित-विराटसह भारतीयांच्या मनात आजही सल, जिव्हारी लागणार्‍या त्या पराभवाची वर्षपूर्ती!

अमेरिकेतून आनंदाची बातमी! SpaceX ने ISRO चा GSAT-N2 उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला, पाहा व्हिडिओ

Utpanna Ekadashi: 'या' तारखेला साजरी होणार उत्पत्ती एकादशी, जाणून घ्या, महत्त्व आणि पुजा विधी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

World Toilet Day 2024: जागतिक शौचालय दिवस १९नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो जाणून घ्या

SCROLL FOR NEXT