Indian 2 Poster Twitter
मनोरंजन बातम्या

Indian 2 Collection : कमल हसन यांच्या 'इंडियन २'ला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद, सलग चौथ्या दिवशीही कमाई घटली

Indian 2 Day 4 Box Office Collection : कमल हसन यांच्या ॲक्शन- थ्रिलर 'इंडियन २' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Chetan Bodke

कमल हसन यांच्या 'इंडियन २' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होती. ७० वर्षीय कमल हसन यांनी या चित्रपटामध्ये एका ७५ वर्षीय कमांडरच्या भूमिकेत दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे. या ॲक्शन- थ्रिलर चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. जाणून घेऊया चित्रपटाने पहिल्या चार दिवसांतल्या कमाईबद्दल....

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी आणि विकेंडला दमदार कमाई केल्यानंतर चित्रपटाच्या कमाईचा आलेख घसरला आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने शेअर केलेला आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टनुसार, चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पण असं असलं तरीही चित्रपटाची कमाई दररोज सातत्याने घटत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी २५.६ कोटींचा व्यवसाय केला. यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) चित्रपटाने १८.२ कोटींची कमाई, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी १५.३५ कोटींचं कलेक्शन तर सोमवारी फक्त ३.१५ कोटींचं कलेक्शन झाले आहे.

चित्रपटाचा आलेख उतरता झाला असून चित्रपटाने आतापर्यंत ६२ कोटींचीच कमाई केलेली आहे. पण असं असलं तरीही चित्रपटाने जगभरात १०० कोटींच्या दरम्यानची कमाई केलेली आहे. या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपटही रिलीज झालेला आहे. पण या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केलेली नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चार दिवसांत फक्त १३ कोटींचीच कमाई केलेली आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच अक्षय कुमारचा हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. चित्रपट फ्लॉप ठरला असला तरीही कथानक प्रेक्षकांना भावले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT