Director Vikram Sugumaran Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shocking! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा बसमध्ये मृत्यू; वयाच्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Director Passes Away : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांचे २ जून २०२५ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Shruti Vilas Kadam

Director Vikram Sugumaran Passes Away : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांचे २ जून २०२५ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते मदुरईहून चेन्नईला बसने प्रवास करत असताना त्यांना छातीत दुखू लागले. तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत .

विक्रम सुगुमारन हे तमिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील परमकुडी येथील रहिवासी होते. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या इच्छेने ते चेन्नईला आले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रसिद्ध दिग्दर्शक बालू महेंद्र यांचे सहाय्यक म्हणून केली. १९९९-२००० दरम्यान त्यांनी 'जूली गणपती' या लघुपटांमध्ये काम केले .

अभिनयाच्या क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले. वेट्रिमारन यांच्या 'पोलाधवन' या चित्रपटात त्यांनी अभिनय केला, तसेच शशिकुमार यांच्या 'कोडीवीरन' मध्येही ते झळकले. मात्र, त्यांची खरी ओळख दिग्दर्शक म्हणून झाली. २०१३ मध्ये आलेल्या 'माधा यानाई कूटम' या त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटाने ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण करून प्रेक्षकांची मने जिंकली .

त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता शांतनू भाग्यराज यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना लिहिले, "प्रिय भाऊ, तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. तुमच्या आठवणी सदैव जपल्या जातील. तुमची खूप आठवण येईल." त्यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान दिग्दर्शक गमावला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT