Shalini Divorce Photoshoot Saam TV
मनोरंजन बातम्या

Divorced Photoshoot: ही तर हद्दच झाली राव! प्री-वेडिंग नाही, हे 'घटस्फोट फोटोशूट'; काय आहे संपूर्ण प्रकार? पाहा PHOTO

Shalini Divorce Photoshoot: प्री-वेडिंग नाही, हे 'घटस्फोट फोटोशूट'; काय आहे संपूर्ण प्रकार? पाहा PHOTO

Satish Kengar

Divorced Photoshoot: आतापर्यंत तुम्ही वेडिंग फोटोशूट, बेबी बंप फोटोशूट, प्री-वेडिंग फोटोशूटबद्दल ऐकले आणि पाहिले असेल. पण आता आम्ही तुम्हाला येथे जे फोटोशूट दाखवणार आहोत, ते घटस्फोट झाल्याच्या आनंदात केलेलं शूट आहे. तमिळ अभिनेत्री शालिनी (Tamil Actress Shalini) तिच्या घटस्फोटाच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Tamil Actress Shalini : 'माझ्याकडे ९९ समस्या आहेत, पण त्यात नवरा हा प्रॉब्लेम नाही'

याबद्दल बोलताना शालिनी म्हणाली, ''माझ्याकडे ९९ समस्या आहेत पण नवरा हा काही आता प्रॉब्लेम नाही. तामिळ अभिनेत्री शालिनीने पतीपासून विभक्त झाल्यानंतर स्वत:ला एक सशक्त महिला म्हणून जगासमोर सादर केले आहे.''

Tamil Actress Shalini

तमिळ अभिनेत्री शालिनीचे हे घटस्फोटाचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शालिनीचे हे फोटोशूट IRIS ने केले आहे आणि तिचे फोटो शेअर करताना लिहिले, 'भारतात पहिल्यांदाच असे घडले आहे, जे अगदी वेगळे आहे आणि हे घटस्फोट सेलिब्रेशनचे फोटोशूट आहे.' तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, प्रत्येक शेवट तुम्हाला नवीन सुरुवातीकडे घेऊन जातो! (Latest Marathi News)

Divorced Photoshoot: 'चुकीचं लग्न मोडणंच योग्य आहे, कारण तुम्हालाही आनंदी राहण्याचा हक्क आहे'

फोटोशूटचे काही फोटो शेअर करत शालिनीने लिहिले की, 'एक घटस्फोटित महिला त्या सर्वांसाठी त्या एका संदेशासारखी असते ज्यांना आपल्याला आवाज नाही असे वाटत असते. चुकीचं लग्न मोडणंच योग्य आहे कारण तुम्हालाही आनंदी राहण्याचा हक्क आहे. कधीही कमकूवत होऊ नका आणि आपल्या आयुष्यावर ताबा मिळवा, तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आवश्यक बदल करा.

Tamil Actress Shalini

'एकटे उभे राहण्यासाठी खूप हिंमत लागते'

या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिले आहे की, 'घटस्फोट म्हणजे अपयश नाही. तुमच्या आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठीचा हा एक टर्निंग पॉइंट आहे. लग्न सोडून एकटे उभे राहण्यासाठी खूप धैर्य लागते, म्हणून मी हे सर्व धाडसी महिलांना समर्पित करते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

Rabies Symptoms: रेबीज म्हणजे काय आणि तो का होतो? सुरुवातीची लक्षणे कोणती?

Shocking: सूनेची क्रूरता! आईसोबत मिळून सासूला झोडलं, जमिनीवर पाडून झिंज्या उपटल्या; VIDEO व्हायरल

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT