Jayam Ravi Divorce  Saam tv
मनोरंजन बातम्या

Jayam Ravi Divorce : १५ वर्षांचं नातं अन् आज अचानक संसार मोडला; वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच अभिनेत्याचा घटस्फोट

Vishal Gangurde

Jayam Ravi Divorce : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जयम रवि नेहमी त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. आज अचानक त्याचं खासगी आयुष्य चर्चेत आलं आहे. जयमने त्याची पत्नी आरतीसोबतच्या १५ वर्षांच्या नात्याला अचानक पूर्णविराम दिला आहे. जयमने आज सोमवारी घटस्फोटाची पोस्ट शेअर केल्यानतंर चाहत्यांना मोठा धक्का बसला. जयम आणि आरती लग्नानंतर १५ वर्षांनी वेगळे झाले आहेत.

'पोन्नियिन सेल्वन'मुळे जगभरात चर्चेत असलेला जयमने ९ सप्टेंबर रोजी एक्स अकाउंटवर एक भली मोठी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने त्याचा १५ वर्षांनंतर संसार मोडल्याची माहिती दिली.

जयमने पोस्टमध्ये म्हटलं की, 'भरपूर विचार आणि चर्चा केल्यानंतर आरतीसोबत घटस्फोट घेण्याचा कठीण निर्णय घेतला. हा निर्णय घेताना घाई केली नाही. आम्ही हा निर्णय खासगी कारणांमुळे घेतला आहे'.

खासगी आयुष्याचा आदर करण्यास सांगत जयमने सांगितलं की, 'माझं सर्वांना आवाहन आहे की, 'माझ्या कठीण काळात माझ्या आणि कुटुंबाच्या खासगी आयुष्याचा आदर करा. माझी नम्र विनंती आहे की, या प्रकरणात कोणतेही आरोप, अफवा पसरवण्यापासून दूर राहा. या प्रकरणाला खासगीच राहू द्या'.

दरम्यान, घटस्फोटानंतर जयम रवि पूर्णपणे कामात व्यग्र राहणार आहे. तो त्याच्या आगामी सिनेमावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेत्याचं म्हणणं आहे की, 'चित्रपटाच्या माध्यमांतून चाहत्यांच्या चेहऱ्यांवर हसू आणत राहील. लोकांच्या प्रेमामुळे आज करिअरमध्ये उंच शिखरावर आहे. या तुमच्या प्रेमासाठी आभार व्यक्त करतो'

2009 साली झालं होतं लग्न

जयम रवि आणि आरतीचं २००९ साली लग्न झालं होतं. या दोघांना अयान आणि आरव अशी दोन मुले आहेत. मागील काही काळापासून दोघांमधील नात्यात कटुता आली होती. यामुळे दोघे वेगळे होणार असल्याची चर्चा सुरु होती. तर जून महिन्यात जयम आणि आरती घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर आरतीने या सर्व अफवा असल्याचं सागंतिलं होतं. त्यानंतर आज सोशल मीडियावर जयमने भली मोठी पोस्ट करत जयमने घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्याचा त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच घटस्फोट झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT