Kamal Haasan Costar Mohan Passed Away Saam TV
मनोरंजन बातम्या

Tamil Actor Mohan Died : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते मोहन यांचे निधन

Kamal Haasan Costar Passed Away : 60 वर्षीय मोहनचा मृतदेह मदुराईच्या थिरुपरकुंडरम मंदिराजवळील रस्त्यावर आढळून आला.

Pooja Dange

Tamil Actor Mohan death At 60 : कमल हसन यांच्या 'अपूर्व सगोधररगल' या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मोहन यांचे निधन झाले आहे. मोहन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. अनेक चित्रपटांमध्ये त्यांची अभिनेता म्हणून काम केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 60 वर्षीय मोहनचा मृतदेह मदुराईच्या थिरुपरकुंडरम मंदिराजवळील रस्त्यावर आढळून आला. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती असे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ते मदुराईमध्ये भीक मागताना दिसले होते. आता मोहन यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संपूर्ण तमिळ चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन अजूनही कामाच्या शोधात होते. त्यांची आर्थिक खूप दयनीय झाली होई. सेलम जिल्ह्यातील मेत्तूर येथील रहिवासी असलेल्या मोहन यांना चित्रपटसृष्टीत पाय रोवायचे होते आणि त्यासाठी तो सतत धडपडत होता.

वृत्तानुसार, 31 जुलै रोजी स्थानिक लोकांनी त्याचा मृतदेह रस्त्यावर पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मदुराई येथील सरकारी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर पीडित, अभिनेता मोहन असल्याचे समजले.

शवविच्छेदनात अद्याप काहीही निष्पन्न झाले नाही आणि मोहनची तब्येत बिघडल्याने त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर अभिनेत्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. (Latest Entertainment News)

अहवालात असे म्हटले आहे की त्याच्या पत्नीचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले आणि तेव्हापासून ते मुख्यतः भीक मागून जगत असत. 1989 मध्ये आलेल्या 'अपूर्व सगोधररगल' चित्रपटात मोहनने अप्पूच्या (कमल हासन) बेस्ट फ्रेंडची भूमिका साकारली होती.

त्यांनी 'नान कडवूल' या समीक्षकांच्या प्रशंसनीय चित्रपटातही काम केले, ज्यात आर्या आणि पूजा यांनीही अभिनय केला होता.मात्र त्यानंतर त्यांना कोणतेही चांगले काम मिळाले नाही. शेवटच्या क्षणी त्यांना ओळखणे देखील कठीण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-२० पूर्वी दुःखद घटना, तरुण क्रिकेटरचा बॉल लागून मृत्यू

Weight Loss Soup: वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी बनवा भाज्याचं सूप, आठवडाभरात पोटाची चरबी होईल कमी

Thane Ring Metro : २९ किमी लांब अन् २२ स्थानके; ठाणे रिंग मेट्रोच्या कामाचा मूहूर्त ठरला, वाचा संपूर्ण माहिती

'घरी ये नाहीतर, तुझे फोटो..'; वस्तीतील तरूणाकडून अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती, अलिबागमध्ये खळबळ

Mumbai Local Train : लोकलमधील मृत्यू रोखण्यासाठी , रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय | VIDEO

SCROLL FOR NEXT