Aakhri Sach  Saam TV
मनोरंजन बातम्या

Aakhri Sach Web Series: तमन्ना भाटिया करणार ११ जणांच्या सामूहिक आत्महत्येचा उलगडा: 'आखरी सच' वेबसीरीज प्रदर्शित

Aakhri Sach Webseries: क्राईम-थ्रिलर सीरीज दिल्लीतील 'बुरारी सुसाईड केस'वर आधारित आहे.

Pooja Dange

Tamannaah Bhatia In Aakhari Sach Webseries:

तमन्ना भाटियाने रॉबी ग्रेवालच्या 'आखरी सच'मध्ये लेडी कॉप म्हणून पदार्पण केलं आहे. डिस्ने+हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या आखरी सचमध्ये तमन्ना एक महिला पोलिस अधिकारी म्हणून दिसत आहे. क्राईम-थ्रिलर सीरीज दिल्लीतील 'बुरारी सुसाईड केस'वर आधारित आहे. तिचे पहिले दोन आकर्षक भाग रिलीज झाले आहेत. या वेबसीरीजला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळत आहे.

रसल डिसेल्वा या चित्रपट समीक्षकांनी ट्वीट केले आहे, “क्राईमवर आधारित ही एक चित्तथरारक कलाकृती आहे. तसेच आता हा तपास अधिकारी अन्या करत आहे. तिचे हे कर्तव्य आहे की सत्य सगळ्यांपुढे आढावा."

त्यांच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, तमन्ना तिच्या शिखरावर असताना पुन्हा एकदा थ्रिलर वेबसीरीज घेऊन आली आहे.

2018 साली दिल्लीच्या बुरारी भागात हृदय पिळवटून टाकणार्‍या ११ मृत्यूंनी संपूर्ण देशला हादरवून टाकले, ज्यांनी या घटनेबद्दल ऐकले त्या प्रत्येकाचे हृदय सुन्न झाले. तमन्ना भाटियाची ही मालिका या घटनेपासून प्रेरित आहे. एका कुटुंबात ११ लोक आनंदाने राहत होते, पण घरचा मुलगा अंधश्रद्धेच्या आहारी गेला. त्याचे दिवंगत वडील आपल्याला मार्ग दाखवत आहेत असे त्याला वाटते.

हळूहळू घरातील सर्व सदस्य त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागतात आणि एके दिवशी ११ जण सामूहिक आत्महत्या करतात. या घटनेने आजूबाजूचे लोक प्रचंड घाबरून जातात. त्याचबरोबर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी विशेष अधिकारी अन्य यांच्याकडे देण्यात येते.

तपासादरम्यान अन्या आणि तिच्या संपूर्ण टीमसमोर असे सत्य समोर आले, ज्याने सर्वांना धक्का बसतो. अखेर कुटुंबातील सर्वांनी मिळून आत्महत्या का केली? या घटनेमागचे रहस्य काय? अंधश्रद्धा आणि जादूटोण्याने सर्वांचा बळी घेतला की हत्येचे प्रकरण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे ही वेबसीरीज पाहिल्यानंतरच कळतील.

निर्विकार फिल्म्स निर्मित 'आखरी सच' ही लेखक सौरव डे यांनी रचलेली आकर्षक वेबसीरीज आहे. अभिषेक बॅनर्जी, शिविन नारंग आणि इतरांसारख्या प्रतिभांसोबत तमन्ना भाटिया अभिनीत, ही वेबसीरीज आता Disney+ Hotstar वर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर भाषांसह प्रवाहित होत आहे.

'आखरी सच' नंतर, तमन्ना तामिळमध्ये अरनामनाई 4, मल्याळममध्ये बांद्रा आणि हिंदीमध्ये वेदा यांसारख्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT