Tadka On Zee5 OTT Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tadka On Zee5: प्रकाश राज दिग्दर्शित 'तडका' सहा वर्षांनी होणार प्रदर्शित, काय आहे कारण? वाचा

'तडक' मल्याळम चित्रपट 'सॉल्ट अन पेपर' या चित्रपटचा रिमेक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tadka On Zee5 OTT Release: दाक्षिणात्य चित्रपटांचा सध्या बोलबाला आहे. दाक्षिणात्य चित्रपट आणि वेबसीरीज यांचे सगळीकडे वर्चस्व पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेकही चांगलेच गाजले आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली आहे. अशातच दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज हे त्यांचा हिंदी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

प्रकाश राज या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. 'तडका' असे या चित्रपटाचे नाव आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 'तडका' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न होता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. (OTT)

'तडका' चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 'तडका - लव्ह इज कूकिंग' ४ नोव्हेंबरला 'झी5'वर प्रदर्शित होणार आहे. 'तडका'च्या पोस्टवर एक कढई दाखविण्यात आली आहे. तसेच त्या कढईमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांना ठेवण्यात आले आहे. (Movie)

'तडक' मल्याळम चित्रपट 'सॉल्ट अन पेपर' या चित्रपटचा रिमेक आहे. २०११ साली प्रदर्शित झालेला 'सॉल्ट अन पेपर' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिक बाबू यांनी केले होते.

'तडका' या आगामी चित्रपटामध्ये नाना पाटेकर, तापसी पन्नू, श्रिया सरन, अली फजल आणि राजेश शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग २०१६ मध्ये पूर्ण झाले होते. या चित्रपटाची कथा दोन जोडप्यांवर आधारित आहे. चित्रपटातील प्रमुख कलाकार कालिदास आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ माया तसेच मिनाक्षीआणि मनू यांच्याभोवती ही कथा फिरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'तुला ऐकायला येत नाही का?' माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उर्मटपणा, डोक्यावर तुळस असलेल्या महिलेला ढकललं

Maharashtra Politics: दोघही फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत, मराठी माणसाचा काय फायदा; उद्धव ठाकरेंनंतर राणेंचा राज ठाकरेंवरही हल्लाबोल

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT