Tabu In Bhoot Bangla Google
मनोरंजन बातम्या

Bhoot Bangla: अक्षय कुमारच्या हॉरर कॉमेडीमध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; पुन्हा साकारणार डायनची भूमिका ?

Bhoot Bangla: अक्षय कुमार १४ वर्षांनी दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत भूत बंगला या आगामी चित्रपटात काम करणार आहे. या जोडीने बॉलिवूडला अनेक उत्तम विनोदी चित्रपट दिले आहेत.

Shruti Vilas Kadam

Bhoot Bangla: बॉलिवूडची सुपरहिट अभिनेता-दिग्दर्शक जोडी पुन्हा एकदा पडद्यावर परतणार आहे. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांनी 'हेरा फेरी', 'फिर हेरा फेरी', 'गरम मसाला' आणि 'भूल भुलैया' सारखे काही उत्तम विनोदी चित्रपट एकत्र दिले आहेत. आता ही जोडी १४ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र काम करत असून अक्षय कुमारचा आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूत बांगला' प्रियदर्शन दिग्दर्शित करत आहे.

गेल्या वर्षी अक्षय कुमारच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना चित्रपटातील अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. आता अखेर निर्मात्यांनी 'भूत बांगला'च्या अभिनेत्रीचे नाव उघड केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत तब्बू दिसणार आहे. तब्बूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याची घोषणा केली.

५३ वर्षीय अभिनेत्री तब्बूने 'भूत बांगला' चित्रपटाचा क्लॅप बोर्ड शेअर केला. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिते, 'आपण इथे बंदिस्त आहोत'. अलिकडेच, अक्षय कुमार आणि परेश रावल यांनी त्यांच्या चित्रपटाच्या जयपूर शेड्यूलमधील बीटीएस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये अक्षय कुमार शर्टशिवाय हिवाळ्यातील उन्हाचा आनंद घेताना दिसत होता आणि परेश रावल देखील त्याच्यासोबत होते.

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांचे आगामी चित्रपट 'भूत बांगला' आणि 'भूल भुलैया' यांचे एकमेकांशी एक खास नाते आहे. दिग्दर्शक-अभिनेता जोडीव्यतिरिक्त, हा चित्रपट जयपूरमधील त्याच ठिकाणी चित्रित केला जात आहे. जिथे 'भूल भुलैया' चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. अक्षय कुमार आणि तब्बू व्यतिरिक्त, परेश रावल, वामिका गब्बी, राजपाल यादव आणि गोवर्धन असरानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

वांगचुक रुग्णालयात, CJPच्या आंदोलनाचं काय? अभिजीत दिपके करणार अन्नत्याग आंदोलन

बिश्नोई गँगच्या रडारवर आमिर खान, तिसरं लग्न आणि धमकी...आमिर खान खरंच लव्ह जिहादी?

Ind vs Eng 3rd ODI : रोहित शर्माच्या रिटायरमेंटची चर्चा असतानाच भारतीय संघात मोठा बदल; कुणाला मिळाली संधी?

FDAची अय्यंगार बेकरीवर धाड; गलिच्छपणा अन् एक्सपायर माल पाहताच 'ऑन द स्पॉट' लायसन्स रद्द, टाळं ठोकलं

SCROLL FOR NEXT