Priya Ahuja Accuses TMKOC producer Asit Modi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priya Ahuja Allegations: प्रिया अहुजाने पुन्हा केले निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाली...

Priya Ahuja Accuses TMKOC producer Asit Modi: रिटा रिपोर्टर पात्र साकारणाऱ्या प्रिया अहुजानं पुन्हा एकदा नव्याने निर्मात्यांवर आरोप केले आहेत.

Chetan Bodke

TMKOC Producer In Trouble Again: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. सध्या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे कमालीचे चर्चेत आहे. मालिकेच्या निर्मात्यांवर काही दिवसांपासून मालिकेतील अनेक अभिनेत्रींनी काही आरोप लावले आहेत. आता पुन्हा एकदा मालिकेत रिटा रिपोर्टर पात्र साकारणाऱ्या प्रिया अहुजानं पुन्हा एकदा नव्याने निर्मात्यांवर आरोप केले आहेत.

निर्मात्यांवर आता पर्यंत जेनिफर मिस्त्री बंसीवाल, मोनिका भदोरिया आणि आता प्रिया अहुजाने आरोप लावले आहेत. सध्या या तीनही अभिनेत्रींनी आरोप केल्यामुळे निर्माते असित कुमार मोदी बरेच वादाच्या भोवऱ्यात अडकलेय. प्रिया अहुजाने एका मुलाखतीच्या माध्यमातून निर्मात्यांवर काही खळबळजनक आरोप लावले आहेत. प्रियाने एका मुलाखतीत सांगितले, निर्मात्यांनी आतापर्यंत मालिकेतील अनेक कलाकारांचे मानधन अजुनही वाढवले नाहीत. यावेळी मुलाखतीत जेनिफरने निर्मात्यांवर केलेल्या आरोपांना देखील दुजोरा दिला आहे. तर आणखी देखील अनुभव शेअर केला आहे.

प्रिया अहुजाने एका मुलाखतीत सांगितले, “निर्मात्यांनी मालिकेतील कलाकारांवर अनेक जाचक अटी- नियम लावले आहेत. गेल्या पाच वर्षापासून मालिकेतील कलाकारांचं मानधन देखील वाढवलं नाही. जेव्हा मी मालिकेत आली, त्यानंतर १८ महिन्यांनी मालिकेतील कलाकारांचं मानधन वाढवलं, असं त्यांनी सांगितलं होतं. कधी कोणी जर विचारलं तर, सहा महिने थांबायला सांगायचे. मानधनाविषयी मी त्यांना कधीच विचारले नव्हते, त्यामुळे निर्मात्यांनी माझं मानधन कधीच वाढवलं नाही.”

प्रिया अहुजा पुढे मुलाखतीत म्हणते, “सोबतच मालिकेसाठी अनेक ठिकाणी कलाकार मंडळी प्रमोशनसाठी जायचे, त्यावेळी निर्मात्यांनीही मला कधीच नेलं नाही. मला जेव्हा याविषयी कळलं तेव्हा, होर्डिंगवर माझे फोटो का नाही लावले जेव्हा असा प्रश्न विचारला, त्यावेळी पीआर टीमची चुक असल्याची सांगितलं, त्यांनी गडबड केल्याची सांगितले. ही चुक दुरुस्त केली जाईल असे सांगितले. हे माझ्यासाठी खूप वेदनादायी होतं.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT