Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam TV
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता...' मालिकेत दया बेनची एण्ट्री होणार का? समोर आली मोठी माहिती

'तारक मेहता का उलटा चष्मा' कार्यक्रमात दयाबेनच्या पुनरागमनासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेत (Program) दयाबेन पुन्हा येणार असल्याची चर्चा मागील काही दिवस होत होती. निर्मात्यांनी दिशा वकानीला विचाराना केल्याचेही सांगण्यात आले आहे. अजूनही या बातमीची पुष्टी करण्यात आली नाही. परंतु तारक मेहता हे पात्र साकारणारा अभिनेता शैलेश लोढाने इंस्टाग्राम पोस्ट करून हिंट दिली आहे.

शैलेश लोढा इंस्टाग्रामवर (Social Media) शायरी लिहीत असतो. त्याच्या शायरीतून तो थेट असित मोदींवर निशाणा साधत असतो असे त्याच्या फॅन्सचे म्हणणे आहे. परंतु शैलेशने यावर कधीही जाहीरपणे पोस्ट केलेली नाही. शैलेश कोणाला संबोधित करत आहे हे त्याच्या पोस्ट वाचून लक्षात येत, असे फॅन्सचे म्हणणे आहे. शैलेश लोढाने नुकतीच एक शायरी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

त्या पोस्टद्वारे शोमध्ये दिशा वकानी परतणार नाही असे त्याला सुचवायचे आहे. पाहूया काय लिहिलं आहे शैलेशने, "औरों के हक़ का जोड़ा सब उसने किसी के मन से जुड़ कर नहीं देखा, इस बात से ही फितरत पता चलती है उसकी जिसने भी उसे छोड़ा, मुड़ कर नहीं देखा." या शायरीच्या शेवटच्या ओळीवरून खूप काही लक्षात येते. अभिनेता कवी शैलेश सांगत आहे की, "उसे छोड़ा, मुड़ कर नहीं देखा." सोशल मीडिया युजर्स म्हणतात की हा थेट असित मोदींवर निशाणा साधला आहे. कारण काही महिन्यापूर्वी बऱ्याच कलाकारांनी तारक मेहता का उलट चष्मा मालिकेतून एक्सिट घेतली होती आणि ते पुन्हा मालिकेत आले नाहीत.

शैलेशने सुद्धा मालिका सोडली आहे. त्यांच्या जागी आता सचिन श्रॉफ तारक मेहता ही भूमिका साकारत आहे. नवीन तारक मेहता मालिकेत आले आहेत. आता प्रेक्षकांना ओढ आहे ती दयाबेनची. मालिकेच्या चाहत्यांना शैलेशच्या पोस्टने खात्री झाली आहे की दिशा वकानी मालिकेत परतणार नाही.

दिशा वकानी गेली तीन वर्ष मालिकेपासून लांब आहे. दिशा मॅटर्निटी लिव्हवर होती. मुलाचा सांभाळ करण्यासाठी सुट्टीवर गेलेली दिशा आता दोन मुलांची आई झाली आहे. आजही चाहते मालिकेत ती कधी परतणार याची वाट पाहत आहेत. असित मोदी म्हणतात की दिशा आली तर बेस्टच होईल. तर कधी म्हणतात, आम्ही नवीन दिशा कार्यक्रमात घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

SCROLL FOR NEXT