Raj Anadkat
Raj Anadkat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहतामधील आणखी एका अभिनेत्याने सोडली मालिका, सोशल मीडियावरुन दिली माहिती…

Chetan Bodke

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका हिंदी टेलिव्हिजनवर बरेच प्रकाशझोतात आहे. मालिकेतील व्हिडिओ, यातील कलाकारांच्या मुलाखती आणि मीम्स सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. सध्या या मालिकेतील कलाकारांची गळती सुरु आहे, असे बोलले तर वावगं ठरणार नाही.

दरम्यान नुकतेच मालिकेतील मुख्य कलाकार असणाऱ्या शैलेश लोढाने हा शो सोडताना त्याच्यावर चाहते बरेच नाराज झाले होते. सोबतच गेल्या वर्षीही बऱ्याच कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला होता.

मालिकेला सर्वाधिक फटका बसला तो, दयाबेनने मालिकेला सोडचिठ्ठी दिल्यावर. अभिनेत्री दिशा वाकनी हिने गेल्या वर्षी मालिकेला रामराम ठोकला होता. तिच्या नसण्यानेही मालिकेची लोकप्रियता कायम आहे. यातच आता पुन्हा एकदा एका अभिनेत्याने ही मालिका सोडली आहे. टप्पुचे पात्र साकारणारा अभिनेता राज अनाडकटने मालिका सोडली आहे.

त्याने ही मालिका सोडल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून टप्पू मालिकेत दिसत नव्हता. सोबतच गेल्या काही दिवसांपूर्वी एका विषयाची भरपूर चर्चा होत होती, तो विषय म्हणजे त्याचे मालिकेतील कलाकारांसोबत पटत नव्हते. राजचे मालिकेतील जेठालाल उर्फ दिलीप जोशी आणि मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यासोबत पटत नव्हते.

पण या सर्व चर्चांना राजने फेटाळून लावले आहे. तो पुन्हा कार्यक्रमात दिसेल अशी आशा चाहत्यांना होती. पण आता तो येणार नसल्याचे त्याने स्वत:ने सांगितल्याने चाहते बरेच नाराज झाले आहेत.

त्याने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिले की, 'सर्वांना नमस्कार, सर्व प्रश्न आणि चाहत्यांचे अंदाज संपवण्याची वेळ आली आहे. नीला फिल्म प्रोडक्शन आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा'सोबतचा माझा प्रवास आज अखेर इथे संपत आहे. शिकण्याचा, मित्र बनवण्याचा आणि माझ्या कारकिर्दीतील काही उत्तमोत्तम वर्ष घालवण्याचा हा एक माझा अद्भुत प्रवास होता.

'या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. संपूर्ण TMKOC टीम, माझे मित्र, कुटुंब आणि अर्थातच माझ्या चाहत्यांचेही. शोमध्ये ज्यांनी माझे स्वागत केले आणि माझ्यावर 'टपू' म्हणून प्रेम केले त्या प्रत्येकाचे आभार.'

सोबतच त्याने पुढे लिहिले की,'माझ्या कामावर तुमचे प्रेम असल्याने नेहमी तुमच्यासाठी उत्तमोत्तम काम करण्याची प्रेरणा मिळते. TMKOC टीमला मालिकेच्या भविष्यासाठी शुभेच्छा. मी तुमचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच परत येईल. तुमचे प्रेम आणि पाठिंबा कायम राहूद्या.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Today's Marathi News Live: ४ जूननंतर अच्छे दिनाची सुरुवात होईल - उद्धव ठाकरे

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Chardham Yatra Bus Accident | बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण आग

Soami Bagh Mausoleum : सेम टू सेम ताजमहालच! बांधकामाला १०० हून अधिक वर्षांचा काळ; पर्यटकांचं ठरतंय आकर्षण

SCROLL FOR NEXT