taarak mehta ka ooltah chashmah fame tanmay vekaria Google
मनोरंजन बातम्या

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Actor Problem: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्याने या मालिकेतील भूमिकेमुळे त्याच्यावर झालेल्या गंभीर शारीरिक त्रासाचा खुलासा केला. सततच्या वेदनांमुळे सरळ उभं राहणंसुद्धा कठीण झाल्याचं त्याने सांगितलं.

Shruti Vilas Kadam

Actor Problem: लोकप्रिय हिंदी मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मधील 'बाघा' ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला तन्मय वेकारियाने आपल्या आरोग्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. गेली १४ वर्षे बाघाची भूमिका साकारल्यामुळे त्याच्या पाठीच्या गंभीर त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एका मुलाखतीत तन्मय वेकारियाने सांगितले की, बाघा हे पात्र सुरुवातीपासूनच थोडे वाकून चालणारे आणि उभे राहणारे दाखवण्यात आले आहे. या भूमिकेची ओळखच त्याच्या खास बॉडी लँग्वेजमुळे निर्माण झाली. मात्र, वर्षानुवर्षे सतत त्याच पद्धतीने अभिनय केल्यामुळे आता माझ्या पाठीवर त्याचा परिणाम झाला आहे.

तो म्हणाले की, आता बराच वेळ सरळ उभे राहणेही अवघड वाटते. पाठीमध्ये सतत वेदना जाणवतात आणि अनेकदा शूटिंगदरम्यानही त्रास सहन करावा लागतो. तरीही प्रेक्षकांच्या प्रेमासाठी आणि पात्रावरील निष्ठेमुळे मी ही भूमिका तितक्याच उत्साहाने साकारत आहेत.

तन्मयने पुढे सांगितले की, अभिनय करताना अनेक कलाकारांना त्यांच्या भूमिकेनुसार शारीरिक बदल स्वीकारावे लागतात. काही वेळा वजन वाढवावे किंवा कमी करावे लागते, तर काही वेळा विशिष्ट चालण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत अंगीकारावी लागते. अशा गोष्टींचा शरीरावर कालांतराने परिणाम होऊ शकतो.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली असून बाघा हे त्यातील सर्वाधिक लोकप्रिय पात्रांपैकी एक मानले जाते. बाघाचा निरागस स्वभाव, विनोदी संवाद आणि हटके शैली यामुळे तन्मय वेकारियाने मोठी लोकप्रियता मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान घेणार पुढाकार

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

Bathing : दररोज साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं का?

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

'आधी पुनर्वसन करा, मगच पाणी न्या!' मावळात पुन्हा २०११ सारखा भडका उडणार? २ ऑक्टोबरला थेट जलसमाधीचा इशारा

SCROLL FOR NEXT