Kapoor Sisters: अंशुला कपूरच्या लग्नात 'कपूर सिस्टर्स'चा जलवा; जान्हवी, खुशी आणि सोनमचा ग्लॅमरस लूक व्हायरल

Shruti Vilas Kadam

अंशुलाच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, लग्नसोहळ्याइतकीच पाहुण्यांच्या फॅशनचीही चर्चा रंगली.

Kapoor Sisters | Saam Tv

जान्हवी कपूरचा एलिगंट आयव्हरी लहेंगा

जान्हवी कपूरने आयव्हरी रंगाचा फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेला डिझायनर लहेंगा परिधान केला. तिचा साधा पण रॉयल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

Kapoor Sisters | Saam Tv

खुशी कपूरचा पेस्टल ग्रीन लूक

खुशी कपूरने पिस्ता-हिरव्या (Pistachio Green) रंगाचा फ्लोरल लहेंगा परिधान केला. त्यासोबतचा गजरा आणि दागिन्यांनी तिचा लूक अधिक खुलून दिसला.

Kapoor Sisters | Saam Tv

सोनम कपूरचा शाही अंदाज

सोनम कपूरने आकर्षक केप-स्टाइल ट्रेडिशनल आउटफिट परिधान करत सर्वांचे लक्ष वेधले. तिच्या पोशाखावरील बारीक हस्तकलेची विशेष चर्चा झाली.

Kapoor Sisters | Saam Tv

अनामिका खन्नाच्या डिझाइन्सची जादू

जान्हवी, खुशी आणि सोनम या तिघींनी प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्नाच्या डिझाइन्सची निवड केली. पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुंदर संगम त्यांच्या लूकमध्ये दिसून आला.

Kapoor Sisters | Saam Tv

प्रत्येक बहिणीची वेगळी स्टाइल

तिघींच्या पोशाखांचा रंग, दागिने आणि स्टाइल वेगवेगळी असली तरी प्रत्येकाचा लूक उठून दिसला आणि चाहत्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

Kapoor Sisters | Saam Tv

सोशल मीडियावर फॅशनची चर्चा

लग्नातील नवदांपत्यासोबतच कपूर कुटुंबातील अभिनेत्रींच्या रॉयल लूकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून फॅशनप्रेमींमध्ये त्यांची चर्चा सुरू आहे.

Kapoor Sisters | Saam Tv

Dark Chocolate Benefits: हृदयापासून मेंदूपर्यंत आरोग्याला मिळतात अनेक लाभ; डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

Dark Chocolate Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा