Shruti Vilas Kadam
डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लॅव्होनॉइड्स रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळू शकते.
यातील अँटीऑक्सिडंट्स आणि कोको मेंदूपर्यंत रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक कार्यक्षमता सुधारू शकते.
डार्क चॉकलेटचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने मूड सुधारतो. एंडॉर्फिन आणि सेरोटोनिनचे प्रमाण वाढण्यास मदत होत असल्याने तणाव कमी होऊ शकतो.
डार्क चॉकलेटमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करून पेशींचे संरक्षण करतात.
यातील पोषक घटक त्वचेचे नुकसान कमी करण्यास मदत करतात. तसेच त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यासही मदत होऊ शकते.
कमी साखर आणि जास्त कोको असलेले डार्क चॉकलेट मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.
डार्क चॉकलेटमध्ये लोह, मॅग्नेशियम, तांबे आणि मँगनीज यांसारखी खनिजे असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास आणि पोषणाची गरज पूर्ण होण्यास मदत होते.