Paneer Puff Recipe: घरच्या घरी बनवा खुसखुशीत पनीर पफ; चहासोबत लागेल भन्नाट चव

Shruti Vilas Kadam

साहित्य

२ कप किसलेले पनीर, १ पॅक पफ पेस्ट्री शीट, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेली ढोबळी मिरची, १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट, १ टीस्पून लाल तिखट, ½ टीस्पून हळद, १ टीस्पून गरम मसाला, मीठ, कोथिंबीर, १ टेबलस्पून तेल आणि बटर.

Paneer Puff | yandex

पनीरचं सारण तयार करा

कढईत तेल गरम करून कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि ढोबळी मिरची परतून घ्या. त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला. शेवटी किसलेले पनीर आणि कोथिंबीर घालून मिश्रण २-३ मिनिटे परता.

Paneer Puff

पफ पेस्ट्री तयार करा

पफ पेस्ट्री शीट रूम टेंपरेचरला थोडावेळ ठेवा. त्यानंतर चौकोनी किंवा आयताकृती तुकडे कापा.

Puff Recipe | saam tv

सारण भरून पफ तयार करा

प्रत्येक पेस्ट्रीच्या मध्यभागी पनीरचं सारण ठेवा. कडा पाण्याने हलक्या ओल्या करून दुमडून घट्ट बंद करा. काट्याच्या साहाय्याने कडा दाबून सील करा.

Puff Recipe

बेक करण्यापूर्वी तयारी

पफच्या वरच्या बाजूला दूध किंवा वितळलेलं बटर हलकं ब्रश करा. यामुळे पफला सुंदर सोनेरी रंग आणि खुसखुशीत पोत येतो.

Puff Recipe

बेक करण्याची पद्धत

ओव्हन १८०°C वर प्रीहीट करा. पफ २० ते २५ मिनिटे किंवा सोनेरी रंग येईपर्यंत बेक करा. एअर फ्रायरमध्येही ते १८०°C वर १५ ते १८ मिनिटांत तयार होतात.

Puff Recipe

गरमागरम सर्व्ह करा

तयार पनीर पफ टोमॅटो केचप, ग्रीन चटणी किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा उत्तम आणि स्वादिष्ट पर्याय आहे.

Puff Recipe

Monsoon Foot Care: पावसाळ्यात चप्पल लागून पायावर फोड येतात? हे ७ सोपे उपाय करतील इन्फेक्शन आणि दुर्गंधी दूर

Saam Tv | Monsoon Foot Care
येथे क्लिक करा