Dilip Joshi Son Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dilip Joshi Son Wedding: जेठालालच्या रिअल लाइफ 'टप्पू'चं धुमधडाक्यात पार पडलं लग्न, लग्नाला दयाबेनची हजेरी

Priya More

Dilip Joshi Son Rithvik Wedding Video:

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (taarak mehta ka ooltah chashmah) या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचेला जेठालाल म्हणजेच अभिनेता दिलीप जोशीच्या (Dilip Joshi) घरामध्ये सध्या नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. जेठालाल यांचा रिअल लाइफ 'टप्पू' म्हणजेच त्यांचा मुलगा रित्विकचा नुकताच धुमधडाक्यामध्ये लग्नसोहळा पार पडला.

जेठालाल यांच्या घरी लक्ष्मी म्हणजेच सूनबाई आली आहे. या लग्नसोहळ्याला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या मालिकेतील दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानीने आपल्या मुलीसोबत लग्नाला हजेरी लावली. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दिलीप जोशी यांचा मुलगा रित्विक जोशीच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अतिशय शाही थाटामध्ये १७ डिसेंबरला त्याचा लग्नसोहळा पार पडला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दिलीप जोशी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आणि मुलासोबत दिसत आहेत. या लग्नाला मोठ्या संख्येने पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. यावेळी जेठालाल व्हाइट कलरच्या शेरवानी आणि पगडी घातल्याचे दिसत आहे. तर त्यांची मुलगी नियतीने ब्लू कलरची साडी नेसली आहे.

दिलीप जोशी यांच्या मुलाचे हे अरेंज मॅसेज आहे. लग्नानंतर रित्विक जोशीने रिसेप्शन पार्टी देखील दिली. मुंबईतील ५ स्टार हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात आलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील कलाकारांनी खूपच धम्माल केली. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रित्विकच्या लग्नातील जे फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये दिशा वकानी पिंक कलरच्या सूटमध्ये दिसत आहे. दिशा वकानीची सहा वर्षांची गोंडस मुलगीही तिच्यासोबत पोज देताना दिसत आहे. दिशा वकानी गेल्या अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमधून गायब असल्याची माहिती आहे. या शोमध्ये ती दिलीप जोशी यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. शोमध्ये दिलीप आणि दिशाच्या मुलाचे नाव टप्पू आहे. दिशा शोमधून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT