Tanuj Mahashabde
Tanuj Mahashabde saam Tv
मनोरंजन बातम्या

TMKOC: अय्यरने रियल लाईफमध्ये बांधली लगीनगाठ, ४२ व्या वर्षात मिळाली बबीतापेक्षा देखणी बायको...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोचा चाहतावर्ग बराच मोठा आहे.

Chetan Bodke

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. या कार्यक्रमाला सुरु होऊन तब्बल १४ वर्ष पूर्ण झाले आहेत.या कार्यक्रमात केवळ एक पात्र नाही तर प्रत्येक पात्राचे स्वतःची वेगवेगळी खासियत आहे म्हणूनच या कार्यक्रमाला प्रेक्षकवर्ग आजही आवर्जून पाहतात. असेच एक पात्र म्हणजे अय्यरचे. त्याचे खऱ्या आयुष्यात तनुज महाशब्दे नाव आहे.

तनुजने वयाच्या 42 व्या वर्षी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बराच काळ रिलेशनशिपमध्ये होता आणि आता तो लग्नबंधनात अडकणार आहे. अय्यरची पत्नी 'बबिता' पेक्षाही सुंदर दिसते. कार्यक्रमात 'कृष्णन सुब्रमण्यम अय्यर'ची भूमिका साकारणारा तनुज महाशब्दे नवीन वर्षाच्या सुरुवातीला लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, बातम्यांनुसार, तनुजची रिअल लाईफमधील पत्नी त्याच्या मालिकेतील पत्नीपेक्षाही म्हणजेच मुनमुन दत्तापेक्षाही जास्त सुंदर दिसत असल्याची चर्चा होत आहे. त्याच्या लग्नाची माहिती मिळताच चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. याआधीही मुनमुन आणि तनुजच्या नात्याबद्दल अनेकवेळा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यांच्या व्हायरल होणाऱ्या बातम्यांवर त्यांनी कधीच स्पष्ट मत दिले नव्हते.

दोघांनीही रिलेशनशिपबद्दल स्पष्ट नाही बोलले असले तरी, एका मुलाखतीदरम्यान मुनमुनला याबाबत प्रश्न विचारले असता तेव्हा तिने त्या चर्चेला धुडकावून लावले आहे.तर दुसरीकडे, तनुजने एका शोमध्ये सांगितले होते की, केवळ इतर लोकच नाही तर मलाही अनेक वेळा विश्वास बसत नाही की मी इतक्या सुंदर अभिनेत्रीच्या जोडीदाराची भूमिका साकारत आहे. कार्यक्रमातील 'कृष्णन सुब्रमण्यम अय्यर' आणि 'बबिता'ची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?