Swarda Thigale Wedding Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swarda Thigale Wedding: 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' फेम स्वरदा ठिगळे अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

Swarda Thigale Wedding Photos: 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' (Swarajya Saudamini Tararani Serial) या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरदा ठिगळेने (Swarda Thigale) बॉयफ्रेंडसोबत गुपचूप लग्न केलं.

Priya More

Swarajya Saudamini Tararani Serial:

मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरूवात करत आहेत. गौतमी देशपांडे, शिवानी सुर्वे, पूजा सावंत, तितीक्षा तावडे आणि योगिता चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी लग्न केले. या अभिनेत्रींपाठोपाठ आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' (Swarajya Saudamini Tararani Serial) या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरदा ठिगळेने (Swarda Thigale) बॉयफ्रेंडसोबत गुपचूप लग्न केलं.

'माझे मन तुझे झाले', 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकांच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळेने मंगळवारी लग्न केले. बॉयफ्रेंड सिद्धार्थ राऊतसोबत तिने गुपचूप लग्न केले. जानेवारीमध्ये स्वरदा आणि सिद्धार्थ यांचा साखरपुडा झाला होता. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. त्यानंतर २६ मार्चला ती विवाहबंधनात अडकली. सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्वरदा ठिगळेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वरदावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्वरदाने लग्नामध्ये पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसली होती. तर सिद्धार्थने लाल रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. दोघांनी देखील कपाळावर मुंडावळ्या बांधल्या होत्या. नववधूच्या रुपामध्ये स्वरदा खूपच सुंदर दिसत होती.

स्वरदाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हळद, संगीत सिरेमनीसोबत लग्नातील काही खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हळदी सिरेमनीमध्ये या कपलने खूपच जबदस्त डान्स केला. लग्नानंतर स्वरदाने लाल रंगाची साडी आणि डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता. तर सिद्धार्थने व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. दोघेही खूपच क्यूट दिसत होते. लग्नानंतर स्वरदाला उचलून घेत सिद्धार्थने जिन्याच्या पायऱ्या चढल्याचा व्हिडीओ देखील तिने शेअर केला आहे. स्वरदाच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

स्वरदाचा नवरा सिद्धार्थ हा डिझायनर आहे. स्वरदा ठिगळे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाची सुरूवात मालिकांमधून केली. २०१३ मध्ये आलेल्या 'माझे मन तुझे झाले' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेमध्ये तिने शुभ्राची भूमिका साकारली होती. यासोबतच तिने २०१७ मध्ये 'सावित्री देवी कॉलेज' या हिंदी मालिकेत काम केलं होतं. त्याचसोबत तिने 'माझे मन तुझे झाले', 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेमध्ये देखील काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT