Swara Bhasker Share Good News Instagram @reallyswara
मनोरंजन बातम्या

Swara Bhaskar Pregnancy: कुणीतरी येणार गं! स्वरा-फहादच्या घरी पाळणा हलणार

Swara Bhaskar Confirm Her Pregnancy : स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट करत ही गोड बातमी शेअर केली आहे.

Pooja Dange

Swara Bhaskar Share Her Baby Bump Photo: अभिनेत्री स्वर भास्कर आणि फहाद अहमद यांचे काहीच महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघांनी गुड न्यूज शेअर केली आहे. दोघेही लवकरच आई - बाबा होणार आहेत. स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट करत ही गोड बातमी शेअर केली आहे.

स्वर भास्करने तिच्या सोशल मीडियावर नवरा फहादसोबतच काही फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये स्वरा फहाद एकमेकांच्या जवळ बसले आहेत. तसेच दोघेही स्वराच्या बेबी बंपकडे पाहत आहेत. (Latest Entertainment News)

स्वराने या फोटोंमध्ये पिंक कलरचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये तिचे बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. फोटो शेअर करत स्वराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एका 'कधीकधी तुमच्या सर्व प्रार्थनांचे उत्तर एकत्र मिळते! धन्य, कृतज्ञ, आनंदी! आम्ही आता पूर्णपणे नवीन आणि अनोळखी जगात पाऊल ठेवत आहोत!'

यासह स्वराने या पोस्टमध्ये फहादला टॅग देखील केले आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी १६ फेब्रुवारीमध्ये कोर्टात लग्न केले होते. त्यानंतर स्वराने त्यांची लव्ह स्टोरी एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली होती.

मार्च २०२३ मध्ये दोघांनी धुमधडाक्यात लग्न केले. साखरपुडा, हळद, मेहेंदी, संगीत, रिसेप्शन असं पारंपरिक पद्धतीने दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला राहुल गांधीसह अनेक दिग्गज राजकीय नेते उपस्थित होते.

स्वराच्या या पोस्टवर अनेक कमेंट येत आहेत. तिचे चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रेटी स्वरा आणि फहादचे अभिनंदन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governmemt Job: सरकारी नोकरी अन् ८१००० रुपये पगार; BRO मध्ये ४६६ रिक्त पदांवर भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: मराठा उमेदवार ओळखा, कसब्यात लागले बॅनर

Solapur Politics: ...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही, शरद पवार गटाच्या नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

SCROLL FOR NEXT