Swara Bhasker And Fahad Ahmad Wedding Reception  Saam TV
मनोरंजन बातम्या

Swara Bhasker Reception: थेट पाकिस्तानातून आला स्वराच्या रिसेप्शनचा लेहेंगा

Swara Bhasker Reception Outfit: स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या कुटुंबीयांनी रविवारी लग्नाचे दुसरे रिसेप्शन आयोजित केले होते.

Pooja Dange

Swara Bhaskar Reception: अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. स्वराने फहाद अहमद गुपचूप लग्न केले आणि त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली. लग्न झाल्यापासूनच स्वर ट्रोलच्या निशाण्यावर आहे. कोर्टात लग्न केल्यानंतर त्यांनी स्वरा आणि फहादने पारंपरिक पद्धतीने लग्न देखील केले.

स्वराने यांच्या मेहेंदी, हळद, संगीत समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला स्वराच्या पाठवणीचा व्हिडिओ पाहून चाहते भावूक झाले आहेत. पण आता त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या फोटोंमध्ये स्वरा भास्कर सुंदर दिसत आहे.

नुकतेच स्वरा-फहादचे रिसेप्शन झाले. त्यात अनेक दिग्गज दिल्लीत राजकारणी आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. आता स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या कुटुंबीयांनी रविवारी लग्नाचे दुसरे रिसेप्शन आयोजित केले होते. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

स्वराने तिच्या बेज लेहेंगामधील फोटोशूट देखील चाहत्यांसोबत इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले आहे. त्यासोबत त्याने लिहिले, "अप्रतिम @alixeeshantheatrestudio. @alixeeshanempire ने बनवलेला लेहेंगा आणि सीमेपलीकडून मला पाठवला! हे शक्य केल्याबद्दल @natrani यांचे विशेष आभार! माझ्या आऊटफितविषयीची अधिक माहिती लवकरच शेअर करेन”

याशिवाय स्वरा भास्कर आणि फहाद अहमदचे पाहुण्यांसोबतचे काही फोटोही समोर आले आहेत. याशिवाय अभिनेत्रीने शूज लपवण्याच्या विधीचा उल्लेख करत काही छायाचित्रेही शेअर केली आहेत, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

गेल्या आठवड्यात स्वरा आणि फहादच्या लग्नासाठी दिल्लीत रिसेप्शन पार पडले होते, ज्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, सपा सदस्य आणि अभिनेत्री जया बच्चन, काँग्रेस नेते शशी थरूर आणि अरविंद केजरीवाल यांनीही हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT