Swara Bhaskar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swara Bhaskar: साथीदार शोधणे म्हणजे कचरा...; स्वरा भास्कर हे असं का म्हणाली?

लव्ह लाईफ बिघडवल्याबद्दल स्वराने शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा यांच्यावर आरोप केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्याने चर्चेत असते. सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यग्र आहे. तिचा आगामी चित्रपट 'जहां चार यार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीत स्वराने आरोप केले आहेत. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आदित्य चोप्रा (Aditya Chopra) या दोघांनी तिची जीवनशैली उद्ध्वस्त केल्याचे आणि लव्ह लाईफ खराब केल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यात स्वराने विचित्र वक्तव्य केले आहे. प्रमोशनावेळी दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केल्याने चर्चा तर होणारच!

लव्ह लाईफ बिघडवल्याबद्दल स्वराने शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा यांच्यावर आरोप केले आहेत. आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट मी लहान वयातच पाहिला होता आणि तेव्हापासून मी माझ्या आयुष्यातील 'राज'चा शोध घ्यायला सुरुवात केली होती, जो हुबेहूब शाहरुखसारखा असावा अशी माझी अपेक्षा होती. खऱ्या आयुष्यात कधीच 'राज' नसतो, हे समजायला मला अनेक वर्षे लागली. त्यामुळे मी रिलेशनशिपमध्ये फारशी रमेल, असे मला वाटत नाही. सिंगल लाईफ कठीण असली, तरी जोडीदार शोधणे त्याहून अधिक कठीण आहे,’ असे स्वरा म्हणाली.

यावेळी बोलण्याच्या ओघात तिनं विचित्र वक्तव्य केलं. साथीदार शोधणे म्हणजे कचरा गाळण्यासारखा आहे, हे सोपे नाही, असे ती म्हणाली.

अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच 'जहां चार यार' चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने मुलाखतीत हे गंमतीशीर वक्तव्य केले आहे. तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर स्वरा भास्कर पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. आगामी 'जहां चार यार' या चित्रपटात अभिनेत्री स्वरा व्यतिरिक्त अभिनेत्री पूजा चोप्रा, शिखा तलसानिया आणि मेहर विज देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात चार मैत्रिणींची कथा दाखवण्यात येणार असून महिला केंद्रित असलेला हा चित्रपट 16 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT