Swades Actress Gayatri Joshi Accident Twitter
मनोरंजन बातम्या

Swades Actress Gayatri Joshi Accident: ‘स्वदेस’ फेम अभिनेत्रीच्या कारला अपघात, दोघांचा मृत्यू; घटनेचा थरारक VIDEO आला समोर

Chetan Bodke

Gayatri Joshi Accident

‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या (Gayatri Joshi) कारला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. परदेशामध्ये पतीसोबत कारमधून प्रवास करत असताना ही घटना घडली आहे. गायत्रीच्या कारला इटलीमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघाताचा भयानक व्हिडीओ समोर आला आहे.

सुदैवाने या कार अपघातामध्ये गायत्री आणि तिचा पती बचावला आहे. या अपघातामध्ये स्विर्त्झलँडच्या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. गायत्रीच्या कार अपघाताचा व्हिडीओ (Accident Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्वीटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. Swades Actress Gayatri Joshi Accident

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री आणि तिचा पती विकास ऑबेरॉय हे दोघेही त्यांच्या लेम्बॉर्गिनी कारने इटलीमध्ये प्रवास करत होते. गायत्रीचा पती कार चालवत होता. गायत्रीच्या कारच्या पुढे- मागे अनेक महागड्या कार जात होत्या. याचदरम्यान ओव्हरटेक करत असताना एका आलिशान कारने फरारी कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर या दोन्ही कारने ट्रकला धडक दिली. या कारमध्ये गायत्रीची देखील कार होती. या अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. तर फरारी कारला भीषण आग लागली. आग लागल्यामुळे या कारमध्ये असलेल्या स्विर्त्झलँडच्या दाम्पत्याला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे कारला लागलेल्या आगीमध्ये दोघांचाही होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

या मार्गावरून प्रवास करताना एका प्रवाशाने आपल्या मोबाइलमध्ये ही घटना कैद केली होता. आता या अपघाताचा व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातामध्ये सुदैवाने गायत्री आणि तिचा नवरा बचावला. अपघातानंतर गायत्रीने स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'विकास आणि मी सध्या इटलीमध्ये आहोत. आमच्यासोबत एक भीषण अपघाताची घटना घडली. पण देवाच्या कृपेने आम्ही दोघं सुखरूप आहोत.' या अपघाताप्रकरणी इटलीच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे. या अपघातामध्ये मेलिसा क्रोटली (६३ वर्षे) आणि मार्कस क्रोटली (६७ वर्षे) या नवरा-बायकोचा मृत्यू झाला.

अभिनेत्री गायत्री जोशीबद्दल सांगायचे झाले तर, तिने ‘स्वदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा तिचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटामध्ये तिने 'किंग खान' म्हणजेच शाहरुख खानसोबत काम केलं होतं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. पण या चित्रपटानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. त्यानंतर तिने ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर विकास ओबेरॉय यांच्यासोबत २००५ मध्ये लग्नगाठ बांधली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT