Taali Web Series New Video Out  Instagram @sushmitasen47
मनोरंजन बातम्या

Taali New Video: नवा लूक, दमदार संवाद; सुष्मिता सेनने शेअर 'ताली'चा नवीन व्हिडिओ

Sushmita Sen New Look : अभिनेत्रीच्या लूकला यूजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Pooja Dange

Sushmita Sen Share New Video From Taali : अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या आगामी 'ताली' या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. मालिकेत ही अभिनेत्री ट्रान्सजेंडर वर्कर श्री. गौरी सावंतची भूमिका साकारणार आहे. या वेबसीरीजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

चाहते ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज ट्रेलरविषयी एक मोठी अपडेट समोर आले आहे. अभिनेत्रीने स्वतः 'ताली' मधील तिचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आणि ट्रेलर कधी रिलीज होणार आहे देखील सांगितलं आहे.

सुष्मिता सेनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री एका नव्या लूक आणि दमदार संवाद बोलताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने कपाळावर मोठी टिकली लावलेली दिसत आहे. तर मागून आवाज येत आहे, 'काही त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणतात, काही त्यांना नौटंकी म्हणतात आणि काही गेम चेंजर्स. ही या प्रवासाची कथा आहे. गाली से ताली तक.

व्हिडिओ शेअर करत सुष्मिताने सांगितले की, 'ताली'चा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे. ही वेबसीरीज १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनादिवशी प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरीज Jio सिनेमावर मोफत पाहता येईल.

अभिनेत्रीच्या या लूकला यूजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका युजरने लिहिले की, "आम्ही ही उत्कृष्ट कलाकृती पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही." तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'तुमची ही वेबसीरीज समाजाला एक संदेश देणार आहे, असे सिनेमे बनत राहिले पाहिजेत.

यादरम्यान काही यूजर्सनी सुष्मिता सेनला खूप ट्रोल देखील केले. सुष्मिताने अशा लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा मी 'ताली'चे पहिले पोस्टर रिलीज केले तेव्हा मला आठवते की बरेच लोक 'छक्का' अशी कमेंट करत होते.

मी विचार केला, ते माझ्याशी असं करू शकतात? मी ते वैयक्तिकरित्या घेतले कारण ते माझ्या टाइमलाइनवर घडत होते. 'अर्थात, मी त्या सगळ्यांना ब्लॉक केले आहे. पण या गोष्टीने मला खुश झाले आहे की मी फक्त गौरी सावंतच्या आयुष्याचे चित्रण करत आहे असं नाही, तर तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याच्यासोबत जगते आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : राज ठाकरे कुटुंबासह मतदानासाठी दाखल

Mitali Mayekar Mangalsutra: ट्रेडिशनल ते वेस्टर्न, प्रत्येक साडीवर मॅचिंग होईल मिताली मयेकरच्या मंगळसूत्राच्या डिझाइन

Municipal Election : भाजपच्या पोलिंग एजंटकडून आचारसंहितेचा भंग, मीरा रोडमध्ये सकाळी नेमकं काय झालं?

Famous Director : प्रसिद्ध दिग्दर्शकाची फसवणूक; 5 लाखांचा गंडा, FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

मतदानाआधी पैशांचा पाऊस! 50 लाखांची रोकड जप्त, नोटांच्या गड्ड्या पाहून पोलिसही चक्रावले|VIDEO

SCROLL FOR NEXT