MS Dhoni's biopic to re-release in cinemas in May
MS Dhoni's biopic to re-release in cinemas in May Saam TV
मनोरंजन बातम्या

MS Dhoni's Biopic To Re-Release: सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्ससाठी खुशखबर; 'MS Dhoni:The Untold Story' चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

Pooja Dange

MS Dhoni's biopic to re-release in cinemas in May: सुशांत सिंहा राजपूतच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. चाहत्यांना पुन्हा एकदा सुशांतला मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. सुशांत सिंह राजपूतचा 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे.

नीरज पांडे दिग्दर्शित 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' २०१६ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सुशांतने महेंद्र सिंहाची भूमिका साकारली होती. सुशांतचा या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं.

सुशांत सिंग राजपूतचा 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक नाही तर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुशांतचा चित्रपट पुढच्या आठवड्यात 12 मे रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)

सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार एमएस धोनीवर आधारित चित्रपट 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'ला जगभरातील भारतीय चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. क्रिकेटरच्या आयुष्यतील खास क्षणांचा आनंद मोठ्या पडद्यावर पुन्हा लुटता यावा, यासाठी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

एमएस धोनीने आधीही हा किस्सा सांगितले आहे, चित्रपटाच्या तयारीदरम्यान त्याला सुशांतचा राग आला होता. धोनी म्हणाला, 'सुशांत अनेकदा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारायचा आणि मी पुन्हा पुन्हा एकच उत्तर द्यायचो, तर त्याला वाटायचे की मी बरोबर बोलतोय आणि मग तो पुढचा प्रश्न विचारायचा.'

धोनीने सांगितले की सुरुवातीला त्याला स्वतःबद्दल बोलणे थोडेसे अवघड वाटले कारण 15 मिनिटांनंतर तुम्हाला स्वतःबद्दल बोलण्याचा कंटाळा येतो. धोनी म्हणाला होता की कंटाळा आला की मला ब्रेक हवा आहे, असे सांगायचे आणि निघून जायचो.

या चित्रपटात कियारा अडवाणी आणि दिशा पटनी व्यतिरिक्त सुशांत सिंग राजपूतसोबत अनुपम खेर आणि भूमिका चावला देखील आहेत. या चित्रपटात अनुपम खेर यांनी सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

धोनीचा हा बायोपिक सुशांत सिंग राजपूतच्या करिअरमध्ये मोठा हिट ठरला आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या हा मृत्यू सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे बोलले जात होते, मात्र काही वेळातच संशयाची सुई खुनाकडे वळली.

हळूहळू सुशांत प्रकरणाचा तपास अंमली पदार्थांपासून ते ईडीच्या हाती गेला. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती असून अद्याप याबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

Liver Health: यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Dharashiv Crime : कळंब शहरात दुकानावर दरोडा; १ लाख रुपये व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी

Today's Marathi News Live: दादरमधील रेस्टॉरंट बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ

Rinku Singh- Yash Dayal: एका ओव्हरमध्ये ५ षटकार मारणाऱ्या रिंकूची यश दयालसाठी खास पोस्ट - Photo

SCROLL FOR NEXT