Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushant Singh Rajput: सुशांतच्या बहिणीने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा, लाडक्या अभिनेत्याच्या आठवणीत चाहते झाले भावूक...

Chetan Bodke

Sushant Singh Rajput: आपल्या अभिनयानेच नाही तर उत्कृष्ट भाषाशैलीने बॉलिवूडमध्ये नावाजलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज ३७ वा वाढदिवस. जरी ही सुशांत आज आपल्यात नसला तरी ही त्याच्या चाहत्यांकडून त्याच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. सोबतच त्याच्या बहिणीकडूनही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याच्या बहिणीने काल सुशांतच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला होता.

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक भावूक करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यावेळी काही लहानपणीच्या किस्स्यांना उजाळा श्वेताने दिला. व्हिडिओ शेअर करत श्वेता म्हणते, 'सर्वांना नमस्कार. भावाच्या वाढदिवसापूर्वी, मला सुशांतच्या काही आठवणी सांगायच्या आहेत आणि त्याला लहानपणी काय करायला आवडायचे ते सांगायचे आहे. आम्हाला घरी गुडिया आणि गुलशन म्हणायचे. आम्ही प्रत्येक कामासाठी नेहमी एकत्रच असायचो.

श्वेता पुढे म्हणते,'आम्ही एका उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन कंपन्या सुरू केल्या होत्या. एक युनियन कंपनी आणि दुसरी रेनबो कंपनी. युनियन कंपनीत आम्ही दुपारी घरी एकत्र झोपायचो, एकत्र जेवायचो आणि घरी मिळणाऱ्या मिठाईचा आस्वाद घ्यायचो. तर रेनबो कंपनीत जेव्हा दुपारी घरातील सर्व झोपायचे त्यावेळी आमच्या गॅरेजमध्ये जाऊन अभिनय करायचो.'

१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या बांद्र्यातील फ्लॅटमध्ये संशयित रित्या मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठी खळबळ निर्माण झाली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा ‘दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो चाहत्यांना खूपच आवडला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT