Hrithik Roshan Background Dancer SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan Background Dancer : हृतिक रोशनच्या मागे डान्स करणारा 'तो' कोण? बॉलिवूडचा सुपरस्टार ओळखलात का?

Dhoom 2 Background Dancer : सुपर डान्सर हृतिक रोशनच्या धूम 2 च्या गाण्यात त्याच्या मागे डान्स करणारा एक मुलाने बॉलिवूडमध्ये मोठ नाव कमावल आहे. जाणून घ्या तो अभिनेता कोण?

Shreya Maskar

सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशनच्या डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात 'धूम 2' चित्रपटाच्या गाण्यावर हृतिक रोशन (Hrithik Roshan) डान्स करताना पाहायला मिळत आहे. मात्र या व्हिडीओतील एका मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यावेळी हृतिक रोशनच्या मागे डान्स करणारा मुलगा हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता होता.

हृतिक रोशनच्या मागे डान्स करणारा मुलगा दुसरा कोणी नसून दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग (Sushant Singh Rajput) राजपूत हा आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतने त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड हादरले.

सुशांत हा उत्तम डान्सर होता. आपल्या शांत स्वभावाने आणि अभिनयाने त्यांने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होते. त्यांनी 2006 मध्ये रिलीज झालेल्या सुपरहिट चित्रपट 'धूम 2' (Dhoom 2) च्या टायटल साँगमध्ये डान्स केला आहे. हृतिक रोशनच्या मागे डान्स करताना सुशांत पाहायला मिळत आहेत. पण हृतिकच्या मागे डान्स करणारा हा मुलगा बॉलिवूडचा स्टार बनेल हे तेव्हा कोणाला वाटले नव्हते.

सुशांतने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये खूप लवकर नाव कमावले होते. चित्रपटात येण्यापूर्वी सुशांतने अनेक मालिकांमध्ये काम केले होते. त्याची 'पवित्र रिश्ता' ही सर्वात गाजलेली मालिका आहे. त्यांनी अनेक थिएटर शो देखील केले आहे. तसेच त्यांने चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनही काम केले.सुशांत सिंग राजपूतने 'काय पो छे' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक हिट चित्रपट देखील दिले आहेत. त्यांचा 'एमएस धोनी :द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट खूप गाजला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT