'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk ) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामुळे सूरजला खूप लोकप्रियता मिळाली आहे. चित्रपटातील सूरजच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिल रिलीज झाला आहे. पाच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली क्रेझ दाखवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे.
'झापुक झुपूक' हा चित्रपट 29 एप्रिलला म्हणजे काल सर्वत्र फक्त 99 रुपयांत पाहायला मिळाला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी पाहायला मिळाली. 99 रुपयांच्या ऑफरचा चित्रपटाच्या कलेक्शनवर चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटाने पाच दिवसांत 1 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.
दिवस पहिला - 24 लाख
दिवस दुसरा - 24 लाख
दिवस तिसरा - 19 लाख
दिवस चौथा - 14 लाख
दिवस पाचवा - 17 लाख
मीडिया रिपोर्टनुसार, 'झापुक झुपूक' चित्रपटाने जगभरात 1.9 कोटींचा व्यवसाय केला आहे.
'झापुक झुपूक' चित्रपटातील गाण्यांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. भविष्यात सूरजचा 'झापुक झुपूक' चित्रपट किती कोटींची कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सूरजच्या 'झापुक झुपूक' चित्रपटात अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे असे अनेक मोठे कलाकार झळकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.