Suraj Chavan Support Aarya Jadhao Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: तू नड बिनधास्त..., आर्या जाधवला सूरज चव्हाणचा फुल्ल सपोर्ट; पाहा VIDEO

Priya More

बिग बॉस मराठीचा सीझन ५ चांगलाच गाजताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणची हवा पाहायला मिळत आहे. सूरज बोलतो कमी पण वेळ आली तर सर्वांना भारी देखील पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांचा सतत राडा असतो. ते घरातील इतर सदस्यांना दमदाटी करतात. पण असे असले तरी देखील सूरज चव्हाण दोघींनाही न घाबरता जशाच तसे उत्तर देतो आणि त्यांची चूक दाखवून देतो. निक्की आर्याला सतत टोमणे मारत असते आणि तिच्यासोबत भांडत असते. यावरून आता सूरज चव्हाण आर्याला पाठिंबा देतो आणि तिला तू बिनधास्त नड असं सांगतो. सूरज चव्हाणचा नवा प्रोमो व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'बिग बॉस मराठी ५'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि आर्या जाधव एकत्र बसून गप्पा मारताना दिसतात. यावेळी सूरज या दोघांना म्हणतो की, 'जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार... बोलत नाहीना म्हणून ते गरीबांचा असा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण ते सहन करायचं? आणि तेच आर्याने केलं तर? आपल्या ग्रुपमधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा...तू नड.', असं म्हणत सूरज चव्हाण आर्या जाधवला फुल्ल सपोर्ट करताना दिसतो.

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले आहेत. बिग बॉसचा नवा सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात आल्यापासून सुरुवातीला खूप शांत होता. पण आता हळूहळू त्याला 'बिग बॉस मराठी'चा गेम कळू लागला आहे. तो देखील घरातील इतर सदस्यांना चूक दाखवून देत आहे.'बिग बॉस मराठी'च्या घरात जिथे चुकीचं होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहतो.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अरबाज पटेल म्हणत आहे की, 'बिग बॉस' खतरनाक आहेत. माझ्या कॅप्टनसीमध्ये डिलेमा दिलाय त्यांनी. कॅप्टनसी बरोबर सुरू होती. इम्युनिटी हा सर्वात मोठा प्रश्न होता. या इंडस्ट्रीत मी नवीन आहे". त्यावर अंकिता म्हणते,'मला प्रामाणिकपणे तुझा खेळ वीक वाटत नाही. मला वैभवचा खेळ वीक वाटतो.' आजच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशनचा टास्क पार पडणार आहे. सदस्यांना त्यांच्या गळ्यात आलेल्या सदस्यांचा फोटो चुलीत टाकून त्यांना नॉमिनेट करायचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT