Supriya pilgaonkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Supriya pilgaonkar Post: 'जहांगिर, तुला...', चिन्मय मांडलेकरला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया पिळगांवकर यांची पोस्ट

Supriya pilgaonkar On Chinmay Mandlekar Trolling: अभिनेता चिन्मय मांडलेकरला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याबद्दल ट्रोल करण्यात आले होते. याचमुळे चिन्मय मांडलेकरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता चिन्मय मांडलेकरला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याबद्दल ट्रोल करण्यात आले होते. याचमुळे चिन्मय मांडलेकरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चिन्मय मांडलेकरने यापुढे कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचे सांगितले आहे. यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी चिन्मय मांडलेकरला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगचा तीव्र निषेध केला आहे. नुकताच पुष्कर श्रोत्रींने नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर आता सुप्रिया पिळगांवकर यांनीही चिन्मय मांडलेकरला पाठिंबा दर्शवला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या अनेक विषयांवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडत असतात. त्यांनी नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरीवर मार्मिक पोस्ट केली आहे. त्यांनी 'जहांगिर मांडलेकर! तुला अनेकानेका आशीर्वाद' असं लिहलं आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करत चिन्मय मांडेलकरला पाठिंबा दर्शवला आहे.त्याचसोबत चिन्मयचा मुलगा जहांगिरला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

चिन्मय मांडलेकरला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी चिन्मय मांडलेकरच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले आहे. मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर, समी विद्वंस अशा अनेक कलाकारांनी चिन्मय मांडलेकरला ट्रोल केल्यामुळे नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं होतं. याआदी पुष्कर श्रोत्रीने ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलंच खडसावलं होतं. त्यांनी नेटकऱ्यांनी खोट्या अकाउंटवरुन ट्रोल केले त्यामुळे चांगलाच संताप व्यक्त केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

SCROLL FOR NEXT