The Kerala Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Supreme Court on the Kerala Story: 'द केरळ स्टोरी'वरील बंदी उठवली, सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला धक्का

'द केरळ स्टोरी'वरून सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला धक्का, पश्चिम बंगालमधील बंदी उठवली

Satish Kengar

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरून पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जीं सरकारला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. आता हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर बंदी घातली होती, जी आता सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. आता लवकरच हा चित्रपट पश्चिम बंगालच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटावर बंदी घालण्याच्या पश्चिम बंगालच्या निर्णयाला आम्ही स्थगिती देत आहोत, असे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणाले आहे. असं म्हणत सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगालमधील 'द केरळ स्टोरी' चित्रपटावरील बंदी उठवली. (Latest Entertainment News)

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, आम्ही पश्चिम बंगाल सरकारने ८ मे रोजी चित्रपटावर घातलेली बंदी उठवत आहोत. या बंदीला कोणताही ठोस आधार दिसत नाही.

ते पुढे म्हणाले की, तामिळनाडू सरकारने कोणतेही निर्बंध लादलेले नसल्याचे वक्तव्य आम्ही रेकॉर्डवर घेत आहोत. चित्रपटगृह मालकांवर चित्रपट न दाखवण्यासाठी कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. चित्रपट दाखवणाऱ्या सिनेमागृहाला पुरेशी सुरक्षा पुरविण्यात यावी, अशा सूचना आम्ही देत ​​आहोत. सरकार किंवा त्याच्याशी निगडित लोकांनी थिएटर मालकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुप्रीम कोर्टाचा SIR प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार

मुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुक महिला आमदाराला भोवलं, पक्षप्रमुखांनी केली थेट बडतर्फीची कारवाई

Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

मला ठार मारण्याची धमकी, उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लाचा राज ठाकरेंवर गंभीर आरोप | VIDEO

Chandrapur Voter: एकाच घरातील ११९ मतदारांपैकी एक महिला अखेर सापडली; नव्या दाव्यानं नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT