Suriya First Look In Kanguva Saam TV
मनोरंजन बातम्या

Suriya Share Glimpse Of Kanguva : सुपरस्टार सूर्याचा खतरनाक लूक ; 'कांगुवा'ला पाहून अंगावर काटाच येईल

Kanguva First Look: 'कांगुवा'चा नवा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.

Pooja Dange

On Suriya's Birthday His First Look In Kanguva Out : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सूर्या शिवकुमारचा आज ४८ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी निर्मात्यांनी त्याचा आगामी चित्रपट 'कांगुवा'ची पहिली झलक शेअर केली आहे. यामध्ये सूर्याचा रुद्र आवतारात दिसत आहे. या चित्रपटात सुर्या एक शक्तिशाली आदिवासी नेता 'कंगुवा'च्या भूमिकेत आहे. जो शत्रूंशी युद्ध करून त्यांना संपवतो. 'कांगुवा'चा नवा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.

'कांगुवा'ची पहिली झलक

कांगुवाच्या प्रोमोची सुरुवात जंगलातील रणांगणाने होते, जिथे शत्रू गटातील एक माणूस अनेक लोकांना मारतो. सरकारला कोंडीत पकडणे हाच त्याचा उद्देश आहे. तर काही अंतरावर एक मुखवटा घातलेला माणूस उभा आहे, जो आगीने पेटलेला भाला फेकून हल्ला केला जातो. यानंतर ही व्यक्ती पळून जाते आणि त्या व्यक्तीचा चेहरा उघड होतो. तो स्वत:ची ओळख कांगुवा म्हणून करून देतो. (Latest Entertainment News)

सूर्या शिवकुमार दुहेरी भूमिकेत दिसणार आहे

'कांगुवा'मध्ये सुर्या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये लाऊड म्युझिक वापरण्यात आले ​​आहे. VFX चा देखील मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. या दोन गोष्टींमुळे चित्रपट पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्साह निर्माण होत आहे. प्रॉडक्शन टीम वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल. हा चित्रपट 2024 मध्ये 2D आणि 3D मध्ये रिलीज होणार आहे.

सिरुथाई सिवा दिग्दर्शित 'कांगुवा' चित्रपटामधेय प्रेक्षकांचे मनोरंजन होणार हे नक्की. त्याची कथा 9व्या शतकापासून 21व्या शतकापर्यंतच्या दीर्घ कालावधीवर आधारित आहे.

'कांगुवा' स्टार कास्ट

सुपरस्टार सुरिया शिवकुमारच्या चित्रपटात दिशा पटानी, योगी बाबू, किंग्सले, कोवई सरला, आनंद राज आदी कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार आहे. तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्रजीसह 10 भाषांमध्ये हा चित्रपट 3D मध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

SCROLL FOR NEXT