Sunny Deol Reaction On Increasing Fees Instagram @iamsunnydeols_fan
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Breaks Silence: सनी देओल ५० कोटी मानधन घेण्याच्या चर्चेवरून इंडस्ट्रीत 'गदर रिटर्न्स', शेवटी स्वतःलाच खरं काय ते सांगावं लागलं

Sunny Deol On Movie Fees: 'गदर २' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता सनी देओलने त्याच्या मानधनात वाढ केली असल्याची चर्चा आहे.

Pooja Dange

Gadar 2 Buy 2 Get 2 Offer:

सनी देओल आणि आमिषा पटेल यांच्या 'गदर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'गदर २' २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटींचची कमाई केली आहे. तर चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता सनी देओलने त्याच्या मानधनात वाढ केली असल्याची चर्चा आहे. सनी देओलने त्याचे मानधन वाढवून ५० कोटी केले आहे.

सनी देओलने याविषयी बोलताना बॉलिवूड हंगामाला सांगितले की, पैशांविषयी होत असलेल्या या चर्चा वैयक्तिक आहेत, कृपया त्याला व्हायरल करून नका. मी सध्या गदर २च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. किती मानधन घ्यायचं हे मी पुढचा चित्रपट साइन करताना ठरवेन.'

मानधनाविषयी बोलताना सनी देओल पुढे म्हणाला, 'मला माझी किंमत माहीत आहे आणि मी माझ्या किंमतीशी तडजोड करत नाही. कुटुंब ही माझीविषयी सर्वात मोठी संपत्ती आहे.' असे बोलून सानी देओल त्याच्याविषयी होत असलेल्या चर्च्यांना पूर्णविराम दिला आहे.

'गदर २'ला चित्रपटाला प्रदर्शित १८ दिवस पूर्ण झाले आहेत. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची क्रेझ संपलेली नाही. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळी शक्कल लढवली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिकिटांवर स्पेशल ऑफर ठेवली आहे.

'गदर २'ची २ तिकीट खरेदी केल्यास २ तिकिटे फ्री मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 'GADAR2' हा कोड वापरावा लागणार आहे. रक्षाबंधनानिमित्त ठेवलेली ही ऑफर ३ सप्टेंबरला संपणार आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कर्जत लोणावळाजवळ रूळावरून मालगाडी घसरली

Astro Tips For Car: नवीन गाडीची पूजा बायकोकडून का करावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार फायदे

Chapati Side Effects: रात्री चपाती खाल्ल्याने उद्भवतात 'या' समस्या, वेळीच घ्या काळजी

Fish : बुद्धिमान आणि सुंदर असतो हा पाण्यातील मासा, ९९% लोकांना नसेल माहिती

Shivsena: '५० खोक्यांमधील आज १ खोका दिसला' संजय शिरसाटांच्या बेडवरूममधील व्हिडिओवर शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT