Gadar 2 Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gadar 2 Poster Out: ढाई किलोचा हात नाही तर हातोडा घेऊन येतोय सनी देओल, गदर २ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

२६ जानेवारीनिमित्त प्रेम आणि देशप्रेम मांडणाऱ्या या चित्रपटचे 'गदर २' पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

Pooja Dange

Gadar 2: The Katha Continues Movie Releasing Soon: बॉलिवूडमधील सर्वात गाजलेली प्रेमकथा तारा सिंह आणि साकीना यांची. 'गदर: एक प्रेमकथा' हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ही प्रेमकथा अजूनही सर्वांच्या लक्षात आहेत. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

२६ जानेवारीनिमित्त प्रेम आणि देशप्रेम मांडणाऱ्या या चित्रपटचे हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. सनी देओलने 'गदर २' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सनी देओलच्या हातात मोठा हातोडा दिसत आहे. तसेच पोस्टरवर हिंदुस्थान जिंदाबाद असे लिहिले आहे.

हिरवी पगडी आणि काळा कुर्ता आणि पायजमा घातलेला असा सनी देओल या पोस्टरमधील लूक आहे. पोस्टरसह सानी देओलने चित्रपट कधी प्तादर्शित होणार, हे सांगितले आहे. 'हिंदुस्थान झिंदाबाद है... झिंदाबाद था... ओर झिंदाबाद रहेगा! या प्रजासत्ताकदिनी २० वर्षानंतर आम्ही घेऊन आलो आहोत भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या चित्रपटाचा दुसरा भाग. #गदर २' अशी पोस्ट सनी देओलने केली आहे.

पोस्ट करताना सनी देओलने सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 'गदर २' या चित्रपटाची वाट चित्रपटप्रेमी गेली अनेक वर्ष पाहत होते. अखेर २० वर्षांनी या चित्रपटची घोषणा करण्यात आली. ११ ऑगस्ट, २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT