Gadar 2 Teaser Released  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gadar 2 Teaser Out: तारा सिंग इज बॅक... 'गदर 2'चा दमदार टीजर प्रदर्शित

Sunny Deol In Gadar 2 Teaser: १९७१ सालाची कथा गदर २ मध्ये दाखविण्यात येणार आहे.

Pooja Dange

Gadar 2 Teaser Released : अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट गदर २ ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. दोन्ही कलाकार चित्रपटाचे संपूर्ण ताकदीने प्रमोशन करत आहेत. निर्माते देखील चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी नवनवीन युक्त करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.

काही दिवसांपूर्वी 'गदर एक प्रेमकथा' या चित्रपटाचा ट्रेलर नव्याने प्रदर्शित करण्यात आ होता. त्यानंतर हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. सध्या 'गदर एक प्रेमकथा' चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे. दरम्यान गदर २ चा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.

काय आहे 'गदर 2'च्या टीजरमध्ये ?

१९७१ सालाची कथा गदर २ मध्ये दाखविण्यात येणार आहे. गदर २ च्या टीजरची सुरूवात व्हॉइस ओव्हरने होते. एका महिलेचं आहे आवाज असून 'पाकिस्तान के दमाद है ये, इन्हे नारियल दो. नहीं तो पूरा पाकिस्तान दहेज़ में लेके जायेंगे जनाब' असं ती म्हणते. त्यानंतर पाकिस्तानात भारताविषयी असलेला असंतोष दाखविण्यात आला आहे. 'अगला जुम्मा दिल्ली में होगा' अशा घोषणा देताना लोक दिसत आहेत.

भारताविरोधात तापलेल्या पाकिस्तानात सनी देओलची एन्ट्री होते. त्यानंतर काही शव आणि चित्रपटातील 'घर आजा परदेसी' हे गाण्यावर इमोशन झालेला सनी देओल दाखविण्यात आला आहे. १ मिनिटं ९ सेकंदाच्या या टीजरमध्ये सनी देओलची ऍक्शन आणि इमोशनल बाजू दाखविण्यात आली आहे. अमीषा पटेल आणि चित्रपटातील त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा दोघेही टीजरमधुन वगळण्यात आले आहे.

गदर २ चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून, सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. २२ वर्षांपूर्वी गदर एक प्रेमकथा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. भारत-पाकिस्तान वेगळा झाल्यानंतरची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच आताही आवडत आहे. सकिना आणि तारा सिंग पुन्हा हिट ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : मुसळधार पावसाने पूरजन्य स्थिती; अमीनापूर गावचा संपर्क तुटला, शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT