Govinda Sunita  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Govinda Affair: 'मी त्याला माफ करणार नाही...' गोविंदाच्या अफेअरवर पत्नीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली ६३ वर्षे...

Govinda Affair: स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सुनीता यांनी तिचा पती गोविंदावर निशाणा साधला आहे.

Shruti Vilas Kadam

Govinda Affair: बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा आणि सुनीता आहुजा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. सुनीता अनेकदा तिचा पती गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे. सुनीता अनेक वेळा गोविंदाच्या अफेअरच्या अफवांवरही बोलली आहे. आता, तिने पुन्हा एकदा तिच्या पतीच्या अफेअरवर मत व्यक्त केलं आणि धक्कादायक खुलासा केला आहे.

सुनीता गोविंदाबद्दल काय म्हणाली?

नवीन पॉडकास्ट मिस मालिनीशी झालेल्या मुलाखतीत सुनीता तिच्या पती गोविंदाच्या अफेअरबद्दल बोलली. सुनीता यांनी असाही दावा केला की गोविंदाने तिचा मुलगा यशला त्याच्या करियरमध्ये मदत केली नाही आणि त्याच्या वडिलांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत. पॉडकास्टचा फक्त प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला असला तरी, प्रोमोमध्ये सुनीता यांनी तिच्या पतीबद्दल केलेल्या स्पष्ट खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे.

सुनीता म्हणते, "मी गोविंदाला माफ करणार नाही. मी नेपाळची आहे. जर मी माझी खुकरी काढली तर सगळे अडचणीत येतील. म्हणूनच मी म्हणतेय, आताचं सावध हो बेटा." गोविंदाच्या अफेअरकडे इशारा करताना सुनीता पुढे म्हणाली, "अशा मुली खूप येतात. पण तू थोडा मूर्ख आहेस. तू ६३ वर्षांचा आहेस. तू टीनाचं लग्न कर. यशचे करिअर धोक्यात आहे ते ठिक करायला त्याला मदत कर कसा बाप आहेस तू.

सुनीताच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर, हिरो नंबर १ गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जोडप्याचे दीर्घकाळचे नाते आता त्यांच्या घराबाहेर पडून लोकांच्या नजरेत आले आहे. गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांच्या अफवाही पुन्हा उठल्या आहेत. गोविंदा त्याच्या पत्नीच्या दाव्यांवर कशी प्रतिक्रिया देईल हे पाहणे बाकी आहे.

सुनीताच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर, हिरो नंबर १ गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या कपलचे नाते आता लोकांच्या चर्चेचा विषय होत आहे. गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांच्या अफवाही समोर येत आहे. गोविंदा त्याच्या पत्नीच्या दाव्यांवर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कोण? भाजप की शिंदेसेनेचा...; देवेंद्र फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला

Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे म्हणाले देवाच्या मनात असेल तर...., फडणवीस म्हणाले मी देवा का?

Nandurbar Politics: निवडणुकीनंतर झालेल्या राड्यावरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली,नंदुरबारमधील राजकारण तापलं

Maharashtra Live News Update: सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा दणदणीत विजय, पालकमंत्री जयकुमार गोरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला..

Black Outfits: प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये ब्लॅक कलरचे हे 5 आऊटफिट्स असायलाच हवेत

SCROLL FOR NEXT