sunil pal and mushtaq khan kidnapping mastermind Arjun Karnawal Encounter Google
मनोरंजन बातम्या

Sunil Pal Kidnapping : कॉमेडियन सुनील पालच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड अर्जुन कर्नावालचा बदलापूर पॅटर्नने एन्काउंटर

sunil pal and mushtaq khan kidnapping अभिनेता मुश्ताक खान आणि कॉमेडियन सुनील पाल यांच्या अपहरणाचा संबंध उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या दोन्ही लोकांचे अपहरण आणि वसुलीची पद्धत सारखीच असल्यामुळे हे काम एकाच टोळीचे असल्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sunil Pal and Mushtaq Khan kidnapping : कॉमेडियन सुनील पाल आणि अभिनेता मुश्ताक खानचा अपहरणकर्ता अर्जुन कर्नावालचा पोलिसांकडून इंकाउंटर करण्यात आला आहे. हा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याने एका इन्स्पेक्टरचे पिस्तूल हिसकावले आणि गोळीबार करताना पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांचे पथक आधीच सतर्क होते. अशा स्थितीत पोलिसांनी तत्काळ प्रत्युत्तर देत आरोपीला घटनास्थळी अटक केली. घटनेच्या वेळी पोलीस या गुन्हेगाराला न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते.

मेरठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लालकुर्ती पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या गुन्हेगाराला लालकुर्ती पोलिसांनी शनिवारीच अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत होते. वाटेत संधी दिसताच या गुन्हेगाराने इन्स्पेक्टरचे पिस्तूल हिसकावले आणि गाडीतून उडी मारली. यानंतर आरोपींनी पोलिसांवरही गोळीबार केला. सुदैवाने पोलिसांना गोळी लागली नाही.पण पोलिसांनी प्रत्युत्तर देत अपहरणकर्ता अर्जुन कर्नावालच्या पायात गोळी झाडली.

शनिवारीच झाली होती अटक

गोळी लागताच तो जमिनीवर पडला. यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हेगाराने कॉमेडियन सुनील पाल, अभिनेता मुश्ताक खान आणि इतर अनेक स्टार्सचे अपहरण करून खंडणी वसूल केली होती. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्रीच त्याला अटक केली. त्यानंतर रविवारी पोलिस त्याचे मेडिकल करण्यासाठी जात असताना पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यासाठी या गुन्हेगाराने पोलिसांवर गोळीबार केला.

हा बदमाश लवी गँगचा सदस्य

गुन्हेगार अर्जुन हा कुख्यात गुन्हेगार लवी टोळीचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी सुनील पाल यांचे अपहरण करून आठ लाख रुपयांची खंडणी वसूल केली होती. याशिवाय इतर अनेक अभिनेते आणि स्टार्सचे अपहरण करण्यात आले होते. यांच्या टोळीने अभिनेते शक्ती कपूरचे देखील अपहरणही करणार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हेगारांनी मेरठमधील एका नामांकित ज्वेलरी शोरूममधून खंडणीच्या पैशातून दागिने खरेदी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT