Ramayan Actor Sunil Lahri on Om Raut's Adipurush Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunil Lahari On Adipurush: हनुमानाच्या तोंडी अशी उद्धट भाषा? आदिपुरुषवर रामायणातील लक्ष्मणाने केली गंभीर टीका

Ramayan's Sunil Lahri Shares His Review Of Adipurush: अरुण गोवीलनंतर आता सुनील लहरींनीही चित्रपटावर टीका केली आहे. आदिपुरूषमधील हनुमानाच्या डायलॉगवर त्यांनी टीका केली आहे.

Chetan Bodke

Ramayan Actor Sunil Lahri on Om Raut's Adipurush: टेलिव्हिजन विश्वात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘रामायण’ होय. ही मालिका प्रेक्षक आजही आवर्जुन पाहतात. त्या मालिकेतीलच एक पात्र म्हणजे लक्ष्मण. या मालिकेत लक्ष्मणाचे पात्र अभिनेता म्हणजे सुनील लहरीने साकारले आहे. सध्या सुनील लहरी मालिकेमुळे नाही तर एका चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत आलेला चित्रपट म्हणजे,‘आदिपुरूष’

या बहुचर्चित चित्रपटाला ‘आदिपुरूष’ रिलीजनंतर खूपच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. चित्रपटावर खूप लोकांनी टीका केल्याचे दिसत आहे. आता कलाकारांनीही चित्रपटावर टीका केल्या आहेत. अरुण गोवीलनंतर आता सुनील लहरींनीही चित्रपटावर टीका केली आहे. आदिपुरूषमधील हनुमानाच्या डायलॉगवर त्यांनी टीका केली आहे.

‘आदिपुरूष’ चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटावर अनेक प्रेक्षकांनी निराशा व्यक्त केली आहे. यातचं रामायण मालिकेतील रामनंतर आता लक्ष्मणानेही चित्रपटावर निशाणा साधला आहे. सुनील लहरींनी नुकताच ‘आदिपुरूष’ चित्रपट पाहिला आणि त्यावर त्यांच मत मांडलं आहे. 'क्रिएटिव्हीटीच्या नावावर संस्कृतीसोबत खेळायचा हक्क कोणलाही नाही आहे'.असं म्हणत सुनील लहरींनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर निशाण साधला.

सुनील लहरींनी आपल्या सोशल मीडियावरुन आदिपुरूषचे डायलॉग शेअर करत, जर आदिपुरूष रामायणावर आधारित असेल तर चित्रपटात अशा भाषेचा प्रयोग करणं योग्य नाही. असं म्हणत चित्रपटावर निशाणा साधला आहे.

सुनील लहरीनी ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले, “ मी आदिपुरूष चित्रपट पाहिला. चित्रपटाकडून खूप अपेक्षा होती. रामायणाचं वेगळं व्हर्जन पाहायला भेटेल अस वाटलं होतं. मात्र निराशा झाली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही तरी वेगळं आणि अनोखे करण्याच्या नावाखाली संस्कृतीची छेडछाड केली आहे. पात्रांना योग्य न्याय दिला नाही. त्यामुळे लोक चित्रपटाशी भावनेने अडकले गेले नाहीत. डायलॉग्सही चागले नव्हते. तुम्ही तरी असा विचार करु शकता का? की, ‘तेल तेरे बाप का,कपडा तेरे बाप का.... या मेघनाद बोलेगा कि अबे चल निकल ले.’ असे डायलॉग हनुमान बोलतील. रावण कधीतरी पुष्पक विमानाऐवजी वटवाघळावर बसून येईल असं आपण कधी विचार तरी केला होता का? मला माफ करा पण निर्मात्यांकडून ही अपेक्ष नव्हती. आपल्या संस्कृती आणि भावनेसोबत हे लोक खेळले आहेत, त्यासाठी तुम्हाला लाज वाटायला हवी.”

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: पर्यटकांच्या बसमध्ये जाण्यासाठी बिबट्याची खिडकीवर झेप, पुढे काय झालं ते पाहाच

Vilas Bhumare : महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले; हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु, प्रचार थांबला!

20-55 वयोगटासाठी रस्त्यावरील खड्डे ठरतायत धोकादायक; पाठदुखी-फ्रॅक्चरची समस्या बळावत असल्याचा डॉक्टरांचा इशारा

Shreeram Lagoo: अभिनयाची आवड, ४२ व्या वर्षी डॉक्टरकीला रामराम, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: शरद पवार यांच्या बॅगांची रायगडमध्ये तपासणी

SCROLL FOR NEXT