Money Lawndring Case In Nora Fatehi And Jacqueline Fernandez Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi: सुकेशने नोराच्या आरोपांची केली पोलखोल, नोराच्या अडचणीत होणार वाढ?

अलीकडेच नोरा फतेहीने सुकेशवर आरोप केला होता की, त्याने तिला आपली गर्लफ्रेंड बनण्याची ऑफर दिली होती. आता या सर्व आरोपांवर सुकेशने आपले मत स्पष्ट केले आहे.

Chetan Bodke

Nora Fatehi: 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक अभिनेत्रींची नावे सुकेश चंद्रशेखरसोबत जोडली जात आहे. ईडीने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोघींचीही चौकशी गेल्या महिन्यात केली होती. अलीकडेच नोरा फतेहीने सुकेशवर आरोप केला होता की, त्याने तिला आपली गर्लफ्रेंड बनण्याची ऑफर दिली होती. आता या सर्व आरोपांवर सुकेशने आपले मत स्पष्ट केले आहे.

आता नोरा फतेहीच्या या आरोपांवर सुकेश चंद्रशेखर म्हणतो, नोराने घर घेण्यासाठी पैसे मागितले होते. मोरोक्कोमध्ये घर घेण्यासाठी त्याने नोरा फतेहीला पैसेही दिले होते. त्याने जॅकलीन फर्नांडिसला सोडावे अशी तिची इच्छा होती. सुकेश म्हणतो की नोरा त्याला अनेकदा काही कारणांमुळे त्रास द्यायची.

सुकेश चंद्रशेखर म्हणतो, आता नोरा म्हणते की मी तिला घर देण्याचे वचन दिले होते. पण ही बाब खरी आहे की, मी तिला घर घेण्यासाठी मोठी रक्कम दिली आहे. कॅसाब्लांका, मोरोक्को येथे तिच्या कुटुंबाला घर घेण्यासाठी नोराने माझ्याकडून पैसे घेतले होते. आता ती स्वतःला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी खोटे आरोप रचत आहे.

पुढे सुकेश म्हणतो, 'आता नोरा म्हणते की, मला कार नको होती. हे सर्वात मोठे खोटे आहे. ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा तिची गाडीही बदलली होती. तिला मर्सिडीज सीएलए ही स्वस्त कार वाटली, म्हणून तिने माझ्याकडे अलिशान कार मागितली होती, मी तिला अलिशान कारही गिफ्ट केली. या सर्व बाबींचा पुरावा मी ईडीला ही दिला आहे.'

'माझ्याकडे नोरासोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स होते. मला नोराला रेंज रोव्हर कार गिफ्ट द्यायची होती, पण त्यावेळी गाडी स्टॉकमध्ये नव्हती आणि तिला लगेच गाडी हवी होती. म्हणून मी तिला बीएमडब्ल्यू एस सीरीजची कार दिली. ती कार तिने बरेच दिवस वापरलीही होती.नोरा मुळ भारतीय नसल्याने तिने ती गाडी तिच्या जिवलग मैत्रिणीचा पती बॉबीच्या नावावर घेतली. जॅकलिन आणि मी रिलेशनशिपमध्ये असल्याने नोराला अनेकदा राग यायचा.'

अलीकडेच, मनी लाँड्रिंग प्रकरणात, नोरा फतेहीने कोर्टात सांगितले होते की, सुकेशने तिला रिलेशनशिपमध्ये राहण्याची ऑफरही केली होती. त्या सोबत लक्झरी लाईफस्टाईल देईल असे सांगितले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील युक्तिवाद स्थगित केला. आता या प्रकरणाची सुनावणी येत्या 15 फेब्रुवारी 2023 ला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT