Money Laundering Case
Money Laundering Case Saam TV
मनोरंजन बातम्या

Money Laundering Case: सुकेश चंद्रशेखरने या अभिनेत्रीकडे केली १०० कोटींची मागणी

Pooja Dange

Sukesh Chandrasekhar Sends Legal Notice Chahat Khanna: पोलिस कोठडीत असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री चाहत खन्ना हिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चंद्रशेखर यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे की, चाहतने एका मुलाखतीत मीडियामध्ये चुकीची माहिती दिली केली आहे. तसेच सुकेश चंद्रशेखरने या मुलाखतीमुळे त्याच्या सामाजिक प्रतिमेवर परिणाम झाल्याचा आरोप केला आहे.

सुकेश चंद्रशेखर यांच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, सुकेशवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झाले नाहीत आणि जोपर्यंत आरोपी कोणत्याही प्रकरणात दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्या आरोपीविरुद्ध भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही.

एवढेच नाही तर सुकेश चंद्रशेखर यांनी असेही म्हटले आहे की, चाहत खन्ना यांनी मीडियाला मुलाखत देताना सुकेश चंद्रशेखर यांच्याबद्दल जे चुकीचे आणि अपमानास्पद गोष्टी बोलल्या त्यामागील कारण म्हणजे तिला मीडियाचे लक्ष वेधून घ्यायचे होते. जेणेकरून चाहत भारतीय फिल्म इंडस्ट्रीत तिची माझी जागा बनवू शकेल.

सुकेश चंद्रशेखरच्या वकिलाने अभिनेत्री चाहत खन्ना हिला कायदेशीर नोटीस पाठवली असून तिने सुकेश चंद्रशेखर यांच्या विरोधात मीडियामध्ये केलेल्या चुकीच्या आणि अपमानास्पद वक्तव्याबद्दल 7 दिवसांच्या आत मीडिया स्टेटमेंट जारी करून माफी मागावी असे सांगितले आहे.

सुकेश चंद्रशेखर यांच्या वकिलाने म्हटले आहे की, अभिनेत्री चाहत खन्ना हिने ७ दिवसांत कोणतेही वक्तव्य जारी केले नाही तर तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

चंद्रशेखर, सध्या तुरुंगात आहे, त्याच्यावर फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांसारख्या हाय-प्रोफाइल व्यक्तींसह अनेक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 17 ऑगस्ट रोजी चंद्रशेखरचा समावेश असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात फर्नांडिस विरोधात आरोपी म्हणून आरोपपत्र दाखल केले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, फर्नांडिस आणि बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही यांना चंद्रशेखरकडून आलिशान कार आणि इतर महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyundai च्या या कार्समध्ये मिळतं CNG इंजिन, 27 किमीचा देतात मायलेज; पाहा लिस्ट

Fourth Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान, राज्यातील 11 जागांवर मतदार देणार कौल

Maharashtra Politics 2024 : 'पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप', रवींद्र धंगेकर बसले आंदोलनाला; पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने सामने

Today's Marathi News Live : जिथे झोपडी, तिथेच घर हवं हे बाळासाहेबांचं स्वप्न; उद्धव ठाकरे

Raj Thackeray: महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनीच सुरु केलं, राज ठाकरेंचा पवारांवर घणाघात

SCROLL FOR NEXT