Suhana Khan and agastya Nanda Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suhana Khan - Agastya Nanda : वर्षाची सुरुवात प्रेमाने? सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या पार्टीतील फोटो व्हायरल !

Suhana Khan - Agastya Nanda : सर्व सेलिब्रिटी त्यांच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि यामध्ये सुहाना खान आणि तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदाचे काही फोटो देखील व्हायरल होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Suhana Khan - Agastya Nanda : शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच, फोटोंमध्ये आणखी काही मित्रही दिसत आहेत, ज्यांना पाहून असे दिसते की सर्व मित्रांनी मिळून नवीन वर्ष साजरे केले आहे. एकीकडे किंग खान, गौरी खान आणि अबरामने एकत्र नवीन वर्ष साजरे केले, तर सुहाना खानने कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा आणि मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वागत केल्याचे व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दिसत आहेत.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेले फोटो अगस्त्य नंदा यांच्या फॅन पेजने शेअर केले आहेत. सुहाना आणि अगस्त्य त्यांच्या मित्रांसोबत ग्रुप फोटोमध्ये एकत्र दिसत आहे. सुहानाने नवीन वर्षासाठी परफेक्ट बॉडीकोन सिल्व्हर गाऊन घातला आहे, तर अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्याने फिटेड सूट घातला आहे, ज्यामध्ये तो खूपच स्मार्ट दिसत आहे. दुस-या फोटोमध्ये दोघेही विश ट्रीला आपली नोट बांधत आहेत.

'द आर्चिज' पासून सुरुवात

झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुहाना आणि अगस्त्याने केवळ त्यांच्या आगामी प्रकल्पांमुळेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुहाना खानचा आगामी 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती डॅडी शाहरुख खानसोबत काम करणार आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 'किंग'मध्ये अभिषेक बच्चन आणि अभय वर्माही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. माहितीनुसार, या चित्रपटाचे शूटिंग मार्च 2025 मध्ये सुरू होणार आहे. तर, 2026 साली ईदच्या मुहूर्तावर हा रिलीज करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.

डॉनच्या भूमिकेत शाहरुख खान

‘किंग’ हा अतिशय धमाकेदार चित्रपट असेल अशी अपेक्षा आहे. शाहरुख खान या चित्रपटात डॉनच्या भूमिकेत दिसणार असून तो सुहाना खानचे संरक्षण करताना दिसणार आहे. दरम्यान, अगस्त्य श्रीराम राघवन यांच्या 'इक्किस' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. हा चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. 'इक्किस' हा चित्रपट या वर्षातील शेवटचा रिलीज असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी खा. प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजप आमदारांची मागणी

सरकारी रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Mini Kashmir Tourism: महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! विकेंडला निसर्गाच्या कुशीत पार्टनरसोबत घालवा वेळ, रोमॅंटिक ठिकाणी कसं जाल?

विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; तीन नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे

Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

SCROLL FOR NEXT