Subodh Bhave Share Post For Ravindra Mahajani Instagram @subodhbhave
मनोरंजन बातम्या

Subodh Bhave Emotional Post : तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेली; सुबोध भावेची रवींद्र महाजनींसाठी भावुक पोस्ट

Ravindra Mahajani Death : अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर पोस्ट करत रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Pooja Dange

Subodh Bhave Share Post For Ravindra Mahajani : सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे. मावळच्या तळेगाव दाभाडीमधील आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय ७७ वर्ष होतं. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटात सृष्ट्टीतील कलाकार पोस्टकरून शिक व्यक्त करत आहेत. दरम्यान अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर पोस्ट करत रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Latest Entertainment News)

सुबोध भावेने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मराठी चित्रपटातील माझं व्यावसायिक अभिनेता म्हणून पहिलं पाऊल रविंद्र महाजनी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या " सत्तेसाठी काहीही " या चित्रपटातून पडले.

अतिशय रूबाबदार, विलक्षण देखणे, खऱ्या अर्थाने मराठी मधील handsome नायक , कायम हसतमुख अशीच तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेली आहे. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली"

सुबोधच्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करून रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली देत आहेत.

रवींद्र महाजनी यांना गश्मीर महाजनी हा एकुलता एक मुलगा आहे. गश्मीर देखील एक अभिनेता आहे. तो मुंबईत राहतो.

रवींद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘गोंधळात गोंधळ’ सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘जाणता अजाणता’ नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यांनी ‘झुंज’, ‘आराम हराम आहे’, ‘देवता’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘लक्ष्मीची पाऊले’ यामध्ये काम केलं. मराठी शिवाय त्यांनी हिंदी, मराठी व गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं.

‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटातून त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. रवींद्र यांचा मुलगा गश्मीर महाजनीदेखील उत्तम डान्सर व अभिनेता आहे, त्याने वयाच्या १५ व्या वर्षी स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली होती. या बापलेकाच्या जोडीने ‘पानीपत’ व ‘देऊळबंद’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मुलाच्या ‘कॅरीऑन’ चित्रपटात त्यांनी कॅमिओ केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT