Tu Mee Ani Amaiara Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Tu Mee Ani Amaiara Movie: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसरचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, लवकरच ‘तू मी आणि अमायरा’ तून येणार भेटीला

Tu Mee Ani Amaiara Announcement: सुभाष घई निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘तू मी आणि अमायरा’ नुकताच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Chetan Bodke

Tu Mee Ani Amaiara Announcement

सुभाष घई निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘तू मी आणि अमायरा’ नुकताच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सुभाष घईंच्या या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सई गोडबोले डेब्यु करत आहे. चित्रपटामध्ये सई गोडबोलेसोबतच अजिंक्य देव, पूजा सावंत, अतुल परचुरे आणि राजेश्वरी सचदेव हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. (Marathi Film)

हा चित्रपट मराठीसोबतच इंग्रजी भाषेमध्येही प्रदर्शित होणार आहे. अनोखी कथा असलेल्या या चित्रपटाची अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही. एकंदरीतच या दमदार कलाकारांची फौज पाहून प्रेक्षक चित्रपटासाठी उत्सुक आहेत. (Announcement)

कलाकारांच्या भूमिकेची माहिती अद्याप गुलदस्त्यात असून कलाकारांप्रमाणेच चाहतेही चित्रपटासाठी उत्सुक आहेत. चित्रपटामध्ये पुजा सावंत सह सई गोडबोलेदेखील झळकणार असल्याने चित्रपट कोणत्या धाटणीचा असेल किंवा चित्रपटाचा आशय काय असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. (Actress)

सई गोडबोलेबद्दल बोलायचे तर, ती एक सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर असून सोशल मीडियावर ती कायमच सक्रिय असते. सई आतापर्यंत अनेकदा व्हिडीओ अल्बमच्या माध्यमातून नेटकऱ्यांच्या भेटीला आली आहे. तिने आतापर्यंत अनेक गाण्यांचं रिक्रिएट करून व्हिडीओ शेअर केल्या आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT