15th August Pre Released Movie Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

15 August Released Movie Collection : रिलीजच्या आधीच बॉक्स ऑफिसवर 'स्त्री २'चा दबदबा, बाकीच्या चित्रपटांची परिस्थिती काय ?

15th August Pre Released Movie Collection : 'स्त्री २', 'खेल खेल मैं', 'डबल इस्मार्ट', 'वेधा' आणि 'थंगालान' हे पाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. प्रदर्शनाच्या आधीच काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

Chetan Bodke

सिनेप्रेमींसाठी १५ ऑगस्ट अगदी खास दिवस असणार आहे. या दिवशी प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. याचं कारण असं की, १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर एकत्र पाच चित्रपट रिलीज होणार आहेत. 'स्त्री २', 'खेल खेल मैं', 'डबल इस्मार्ट', 'वेधा' आणि 'थंगालान' हे पाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. प्रदर्शनाच्या आधीच कोणत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे, जाणून घेऊया...

सॅकल्निकच्या रिपोर्टनुसार, 'स्त्री २' चित्रपटाने 'खेल खेल मैं' आणि 'वेदा'सह सर्वच चित्रपटांना मागे सारत सर्वाधिक कमाई केलेली आहे. 'स्त्री २' चित्रपटाला प्रदर्शनाच्या आधीपासूनच दमदार प्रतिसाद मिळत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री २' चित्रपटाचे ४८ तासांत तब्बल १ लाख ३६ हजार तिकिट विकले गेले आहेत. यामध्ये एकूण ४.४६ कोटींची कमाई केलेली आहे. इतर चार चित्रपटांच्याही प्रदर्शनाच्या आधीच्या कमाईवर एक नजर टाकूया.

अक्षय कुमारच्या 'खेल खेल मैं' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये फार कमी कमाई केली आहे. चित्रपटाचे आतापर्यंत फक्त २३४८ तिकिटे विकली गेली आहेत. यामध्ये जेमतेम १० लाखांचीच कमाई केलेली आहे. तर 'वेदा' चित्रपटानेही फार कमी कमाई केलेली आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या ६३२२ तिकिटांची विक्री झाली असून १९ लाखांची कमाई केलेली आहे. या सर्वांमध्ये 'स्त्री २' अव्वल स्थानावर आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'स्त्री' चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT