'स्टोरीटेल' आणलीये ३९९ रुपयांची भन्नाट 'सिलेक्ट' आॅफर - Saam Tv
मनोरंजन बातम्या

Storytel I'स्टोरीटेल'ने आणलीये ३९९ रुपयांची भन्नाट 'सिलेक्ट' आॅफर

'स्टोरीटेल'ने आपल्या ग्राहकांसाठी वार्षिक वर्गणीची एक भन्नाट आॅफर आणली आहे. या नव्या आॅफरमुळे वाचकांची ही 'आॅडिओ लायब्ररी' अधिकच विस्तारणार आहे

साम टिव्ही

पुणे : आपल्यापैकी प्रत्येकाने कुणा ना कुणाकडून गोष्ट ऐकण्याचा आनंद नक्कीच घेतला असेल. मग ती वाचून घेतलेली गोष्ट असो वा आजी-आजोबा-आईने सांगितलेली गोष्ट असो. गोष्ट ऐकण्याचं वय संपल की गोष्टी वाचायचं वय येतं. पण आज डिजिटल युगात ही गोष्टही हरवली आहे. 'आॅडिओ बुक्स' च्या माध्यमातून आपली आवडती पुस्तकं आला थेट आपल्या मोबाईलमध्ये आली आहे.

हीच आहे आॅडिओ बुक्सची क्रांती. या आॅडिओ बुक्समध्ये अग्रगण्य आहे ते 'स्टोरीटेल'. गोष्टी ऐकायला वय लागत नाही, हे 'स्टोरीटेल' ने सिद्धच केलंय. आता तर 'स्टोरीटेल'ने आपल्या ग्राहकांसाठी वार्षिक वर्गणीची एक भन्नाट आॅफर आणली आहे. या नव्या आॅफरमुळे वाचकांची ही 'आॅडिओ लायब्ररी' अधिकच विस्तारणार आहे. आता 'स्टोरीटेल'चा 'सिलेक्ट' हा नवा वार्षिक प्लॅन केवळ ३९९ रुपयांमध्ये ग्राहक खरेदी करु शकतील. मूळचा ११९८ रुपयांचा हा वार्षिक प्लॅन आता केवळ ३९९ रुपयांनाच मिळणार आहे. अर्थात ही आॅफर ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंतच आहे.

या वार्षिक वर्गणीमध्ये वाचकांना १० पेक्षा अधिक प्रादेशिक भाषांमधली आॅडिओ बुक्स आणि ई-बुक्सचा अनलिमिटेड अॅक्सेस दिला जाणार आहे. ३९९ रुपयांमध्ये वार्षिक सबस्क्रिप्शन मिळाल्याने 'स्टोरीटेल'वर पुस्तकांची कॅटॅगरी वाढेल, असा कंपनीला विश्वास आहे. त्यामुळे वाचकांसाठी अधिक आॅडिओ बुक्स उपलब्ध होतील. सध्या स्टोरीटेलवर दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तकांचा खजिना उपलब्ध आहे. त्यात दर आठवड्याला वाढ होऊन ती आॅडिओ बुक्स वाचकांना उपलब्ध होतात.

या नव्या प्लॅनबाबत स्टोरीटेल इंडियाचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ यांनी माहिती दिली आहे. ''दिवसेंदिवस आॅडिओ बुक्स लोकप्रिय होत आहेत. ग्राहकांचीही आॅडिओ बुक्सची पसंती वाढली आहे. आता स्टोरीटेल ११ प्रादेशिक भाषांमधील आॅडिओ बुक्सच्या अॅक्सेस बरोबरच वार्षिक मेंबरशीपचीही आॅफर देत आहे. पुस्तके व कथांचा शोध पाॅकेड फ्रेंडली बनविणे हा आमचा उद्देश आहे,'' अशी माहिती त्यांनी दिली.

स्टोरीटेलचे हे अॅप गुगल प्ले स्टोअर ios अॅप स्टोअरवर ग्राहकांना उपलब्ध होईल.

२७ नोव्हेंबर २०१७ रोजी आॅडिओ बुक्स आणि ई-बुक अॅपसाठी स्टोरीटेलने भारतात स्ट्रिमिंग सेवा लाँच केली. स्विडनच्या स्टाॅकहोम येथे या कंपनीचे मुख्यालय आहे. जगातल्या २५ भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. भारतात इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, तामिळ, मल्याळम, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये हे अॅप उपलब्ध आहे. स्टोरीटेलवर दोन लाखांहून अधिक आॅडिओ व ई-बुक्स उपलब्ध असून ग्राहकांना उत्तमोत्तम कथा उपलब्ध व्हाव्यात, हा आमचा मानस आहे, असेही योगेश दशरथ यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT